आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडघम:सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पालिका निवडणूक चर्चेला उधाण, 104 खुल्या जागा; त्रिस्तरीय प्रभागरचना; प्रस्थापित सुखावले​​​​​​​

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीची १० मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केलेली प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश आणि तेही राज्य निवडणूक आयोगाला दिल्यामुळे १ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर झालेली त्रिस्तरीय प्रभागरचना कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वजनदार नगरसेवकांसह प्रस्थापित सुखावल्याचे चित्र आहे. तर नव्याने प्रभागरचना होणार नसल्यामुळे इच्छुकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ओबीसी आरक्षणवगळून निवडणूक होणार असल्यामुळे महापालिकेच्या १३३ जागांपैकी ३६ ओसीबी जागा वगळल्या जातील.

त्यामुळे यापूर्वी ६८ खुल्या प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या जागा ३६ ने वाढून १०४ खुल्या जागा उपलब्ध होतील. दुसरीकडे, निवडणूक आयोगाने पुढील काही दिवसांत अंतिम प्रभागरचना जाहीर केली तर प्रभागनिहाय मतदार याद्यांची प्रसिद्धी, आरक्षण सोडत व त्यावर हरकती व सूचना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या निवडणुकीसाठी लागणारे जवळपास साडे नऊ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपलब्धता यासाठी महापालिका निवडणूक विभागाची भागमभाग सुरू झाली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारने विधिमंडळात विशेष कायदा पारीत करून राज्यातील १८ महापालिकांकरिता तयार केलेली प्रारूप प्रभागरचना रद्द करून नव्याने प्रक्रिया करण्याबाबत स्वत:कडे घेतलेल्या अधिकाराच्या निर्णयाविरोधात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी लवकरात लवकर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने नेमका काय निर्णय दिला हे स्पष्ट नसल्यामुळे दिवसभर तर्कवितर्कांना ऊत आला होता.

बातम्या आणखी आहेत...