आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरपट्टी विभाग:पालिकेची घरपट्टी विभाग आपल्या दारी मोहीम; पाथर्डीत पहिल्याच दिवशी ३० लाखांची वसुली

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी घरपट्टी उपकार्यालयातर्फे घरपट्टी व पाणीपट्टी मिळकत थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी महापालिका आयुक्त कैलास जाधव, कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे, विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘घरपट्टी विभाग आपल्या दारी’ ही दोन दिवसीय मोहीम राबविण्यात येत असून पहिल्याच दिवशी ३० लाख ३६ हजारांची वसुली करण्यात आली.

पाथर्डी उपविभागीय कार्यालयाच्या वतीने दोन दिवसीय वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचे आयोजन पाथर्डी उपविभागीय कार्यालयाचे कर निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी केले. यावेळी वसुली मोहिमेत थकबाकीसह चालू बिल भरण्यासाठी अभियान राबविण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन अर्चना तांबे, डॉ. मयूर पाटील यांच्यातर्फे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी पाथर्डी घरपट्टी उपकार्यालयाकडील विविध भागांत मोहीम राबवून चित्ररथाद्वारे घरपट्टी विभाग आपल्या दारी या संकल्पनेतून करधारकांपर्यंत सुसंवाद साधण्यात आला. कर भरा सहकार्य करा, दंडात्मक कारवाई टाळा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी अधीक्षक सुनील आव्हाड, दशरथ भवर, कर निरीक्षक अंबादास विधाते, यशवंत लहामगे, राजू कवर, राजेंद्र मौले, संतोष गायकवाड, आनंद जाधव, दीपक कोथमिरे, दत्तू गावंडे, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...