आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निविदा:25 इलेक्ट्रिक बसेससाठी‎ सोमवारी पालिकेची निविदा‎

नाशिक‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपासून रखडलेल्या २५‎ इलेक्ट्रिक बसेसला चालना‎ मिळण्याची शक्यता असून केंद्र‎ सरकारच्या एन कॅपच्या योजनेतून २५‎ इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी सोमवारी‎ (दि. १३) निविदा निघणार आहे. दोन‎ महिन्यात इलेक्ट्रिक बसेससाठीची‎ निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असून केंद्र‎ सरकारचे प्रतिबस अनुदान थेट‎ ठेकेदाराला वळते केले जाणार आहे.‎ सर्व प्रक्रिया विनाविघ्न पार पडली तर‎ येत्या चार महिन्यात नाशिकमध्ये‎ इलेक्ट्रिक सिटी बस धावताना‎ दिसणार आहेत.‎ सिटी लिंक तोट्यात आहे.

सध्या‎ दोनशे बस सीएनजी आणि पन्नास‎ डिझेल बस ग्रॉस कॉस्ट तत्त्वावर सुरू‎ आहेत. पालिकेने केंद्र सरकारच्या‎ फेम-२ योजनेंतर्गत ५० इलेक्ट्रिक बस‎ घेण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला‎ हाेता. त्यानुसार पालिकेला‎ केंद्राकडून प्रतिबस ५५ लाख रुपये‎ अनुदान अपेक्षित होते. मात्र,‎ प्रस्तावात त्रुटी असल्याने प्रकरण‎ बारगळले. अखेर नॅशनल एअर‎ क्लिन मिशन योजनेअंतर्गत ५०‎ ऐवजी २५ इलेक्ट्रिक बसेस जीसीसी‎ तत्वावर घेऊन सदरचे अनुदान हे‎ थेट पात्र ठेकेदाराला देण्याचा निर्णय‎ झाला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...