आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या पूर्व विभागात अनधिकृत फलकबाजीविरोधात मोहीम राबवत ७५ फलक जप्त केले. शहरात फलक व बॅनर लावण्यासाठी महापालिकेने नियमावली निश्चित केली आहे. त्यानुसार फलक लावण्यापूर्वी परवानगी घेणे बंधनकारक असते.
मात्र, तरीही अनेक व्यावसायिक विनापरवानगी फलक व बॅनर लावून रस्ते व पदपथांवर अतिक्रमण करतात. मनपा पूर्व विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने याविरोधात कारवाई मोहीम राबवली. तीन दिवसांत मुंबई नाका ते राणेनगर समांतर रस्त्यादरम्यान, पांडवनगरी बस थांबा ते कलानगर चौक येथे ही कारवाई करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.