आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:खुनाचा आरोप विवाहितेची आत्महत्या : खून केल्याचा संशय ; तीन वर्षांपूर्वी सोनालीसोबत लग्न झाले आहे

नांदूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदूर गावात विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आला. सोनाली अभिषेक देवकर (२२) असे तिचे नाव आहे. मात्र तिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नांदूर येथे राहणारा अभिषेक देवकर याचे तीन वर्षांपूर्वी सोनालीसोबत लग्न झाले आहे. या दाम्पत्याला दीड वर्षाची मुलगी आहे. सकाळी तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे तिच्या पती आणि सासूच्या लक्षात आले. दोघांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. नातेवाइकांनी सिव्हिलमध्ये धाव घेत आक्रोश केला. मयत सोनालीच्या गळ्यावर रक्ताचे डाग आणि पायावर जखमा असल्याने पती आणि सासूने गळा आवळून खून केल्याचा आरोप संतप्त नातेवाइकांनी केला. आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ४ दिवसांपूर्वी सुरतहून आली सोनाली पती आणि सासू सोनालीस माहेरून एक लाख रुपये आणण्यासाठी शारीरिक, मानसिक छळ करत असल्याने ती सुरत येथे आईकडे गेली होती. चार दिवसांपूर्वी सासू आणि पतीने तिला त्रास देणार नाही अशी हमी देत नाशिकला आणले होते. दोघांनी तिला बेदम मारहाण करत तिचा खून केला. नंतर गळफास घेतल्याचा बनाव केला असा आरोप नातेवाइकांनी करत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने सिव्हिलमध्ये तणाव निर्माण झाला होता. सरकारवाडा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...