आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Murder Of A Child Who Has Failed To Give Birth Because His Parents Did Not Do It In The Name Of Farming And House; Incidents In Niphad Taluka

केवढे हे क्रौर्य:आई-वडिलांनी शेती अन् घर नावावर न केल्याने जन्मदात्याचा वैफल्यग्रस्त मुलाने केला खून

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जन्मदात्या आई-वडीलांनी शेती व घर नावावर करावी या कारणासाठी भांडण करून वैफल्यग्रस्त मुलाने आई - वडिलांचा खून केल्याची घटना निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे घडली असून, या घटनेमुळे माळेगाव भागात खळबळ उडाली आहे.

कौटुंबिक वादतातून हत्या

निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील रामदास सुडके व त्यांचे कुटुंबीय राहत होते. मुलगा दत्तात्रय सुडके हा शेती नावावर करण्याकरता वारंवार भांडण करुन आई-वडिलांना मारहाण करत होता. मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान दत्तात्रय सुडके याने घर व शेती नावावर करून द्यावी याच कारणावरून भांडण काढत आई वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत दत्तात्रय सुडके (35) याने लोखंडी पाइप घेत वडील रामदास सुडके (70) सुरुबाई सुडके (65) या दोघांना गंभीर जखमी केले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच लासलगाव चे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

गुन्हा दाखल

शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या रामदास सुडके व सुरूबाई सुडके यांना निफाड येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना सुरुबाई सुडके या रस्त्यात मृत्यू झाला. तर रामदास सुडके यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान यातील संशयित दत्तात्रय सुडके यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे