आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकाचा खून:शेतकरी मुलांच्या आश्रमात चारवर्षीय बालकाचा खून; ‘आधारतीर्थ’मधील घटना,  पोलिसांकडून चौकशी

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले तसेच गरीब कुटुंबातील मुलांसाठी असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमात ४ वर्षीय बालकाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. त्र्यंबकेश्वर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलोक विशाल शिंगारे (वय ४) असे मृत बालकाचे नाव आहे.

पोलिस उपनिरीक्षक वाय. एस. खैरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आधारतीर्थ आश्रमात सकाळी ६ च्या सुमारास ट्रॅक्टरच्या बाजूला अलोक मृतावस्थेत आढळून आला. आश्रमातील अशोक पाटील यांनी संस्थेच्या वाहनातून त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालात मुलाचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. अलोक कुणासोबत राहत होता. तसेच त्याच्या कुटुंबियांची माहिती पोलिसांकडून घेण्यात आली. आश्रमात यापूर्वी मुलांचा छळ होत असल्याबाबत अनेक तक्रारी आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भांडण झाल्याचे निष्पन्न आलोकचे सायंकाळी आश्रमातील मुलांसोबत भांडण झाले होते. त्यातून तर हा प्रकार झाला नाही ना याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. आलोकचा मोठा भाऊ देखील याच आश्रमात आहे. दरम्यान, आश्रमातील मुलांचे समुपदेशन करण्यासाठी मानसोपचार तज्ञांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मध्यरात्री ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...