आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:नाशिकच्या आरपीआयच्या महिला पदाधिकाऱ्याचा 36 वार करून खून, संशयित ताब्यात

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आरपीआयच्या महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार संत कबीरनगर येथे ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री उघडकीस आला. या महिलेच्या अंगावर ३६ वार करण्यात आले असून अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संत कबीरनगर येथे राहणाऱ्या पूजा आंबेकर (२७) या संदीप आंबेकर नामक व्यक्तीसोबत वास्तव्यास होत्या. मध्यरात्री दोघांमध्ये काही तरी कारणातून वाद झाले. या वादातून संशयिताने पूजा यांच्या सर्वांगावर चाकूने वार करत त्यांचा खून केला. आरडाआेरड झाल्याने शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. घटनेनंतर संशयित फरार झाला होता. गंगापूर पोलिसांच्या गुन्हे शोधपथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांना सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये धाव घेतली. खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. प्रथमदर्शनी अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे संत कबीरनगरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...