आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहुणीचा खून:लग्नासाठी तगादा लावल्याने भाऊजीचे कृत्य, जमावाच्या हल्ल्यात खून झाल्याचा केला बनाव

नाशिक/घोटी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहुणीने भाऊजीकडे विवाहासाठी तगादा लावल्याने तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. शनिवारी (११ जून) पहाटे इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीवर हा प्रकार उघडकीस आला. संशयित भाऊजीने जमिनीच्या वादातून बारशिंगवे गावातील जमावाने घरे जाळून हल्ला केल्याने त्यात मेहुणीचा मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर संशयिताने खून केल्याची कबुली दिली. शरद महादू वाघ असे संशयिताचे नाव आहे. लक्ष्मी संजय पवार (२०, रा. बिरुळे, ता. नांदगाव) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

अधरवड येथील शरद वाघ हा कातकरी वस्तीवर दोन बायकांसोबत वास्तव्यास आहे. त्या दोघीही सख्ख्या बहिणी आहेत. त्यानंतर संशयिताचे लहान मेहुणी लक्ष्मीसोबतही प्रेमसंबंध होते. काही दिवसांपासून तिने शरद यास तिसऱ्या विवाहासाठी तगादा लावला होता. मात्र, तो सातत्याने तिला नकार देत होता.

बातम्या आणखी आहेत...