आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Murder Of Wife And Friend Of Chinese Seller In CIDCO; It Has Been Revealed That The Two Were Beaten Up, A Case Has Been Registered With The Ambad Police

अंबड पोलिसांत गुन्हा दाखल:सिडकोतील चायनीज विक्रेत्याची पत्नी व मित्राकडून हत्या; दोघांनी मारहाण केल्याचे झाले उघड

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना चायनीज व्यवसायिकाच्या राहत्या घरात मुत्यू चा प्रकार अकस्मात नसून तो खूनच असल्याचे अंबड पोलीसक्या तपासात उघड झाले आहे, विशेष म्हणजे या प्रकरमाग दुसरे तिसरे कोणी बाहेरचे नसून त्याचे पत्नी नेच हा त्याच्या मित्रांच्या साह्याने केलेल्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

तिबेटीयन मार्केट येथे चायनीज व्यवसाय करणारे कैलास बाबुराव साबळे (वय ४५) यांना रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मित्र पिंटू गायकवाड याने घरी आणून सोडले. यावेळी कैलास यांच्या डोक्याला लागले असताना त्यांनी स्वतः जखमेवर हळद लावून झोपला. सकाळी त्यांच्या पत्नीने पाहिले असता त्यांची हालचाल होत नव्हती. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली डोक्यावर व पायावर जखमेच्या खुणा आढळून आल्या. पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण काय हे कळणार आहे. मात्र खून झाल्याच्या चर्चामुळे सिडकोत दिवसभर दहशतीचे वातावरण तयार झाले होते.

दरम्यान सोमवारी दुपारी अंबड पोलिसांच्या तपासात साबळे यांचया पत्नीने त्याच्या मित्रांच्या मदतीने बेदम मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगत तसाच पत्नीसह तिंघाविरोधत सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत असून पत्नीची सखोल चौकशी करून लवकरच अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...