आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरू रामदास प्रतिष्ठान आक्रमक:पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा नाशिकमध्ये निषेध; कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करत नाशिकमध्ये गुरू रामदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सिद्धू मूसेवाला यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्या, अशी मागणी करत द्वारका परिसरात बॅनरबाजी करण्यात आली. तसेच प्रतिष्ठानच्या वतीने मूसेवाला यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

आपल्या खास गाण्याच्या शैलीमुळे सिद्धू मूसेवाला यांनी गायक म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पंजाबी बांधवांचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते. मात्र, काही दिवसांपूर्वी गोळीबार करत मुसेवाला यांची हत्या करण्यात आली. देशभरातून या घटनेचे पडसाद उमटले.

नाशकात देखील बुधवारी गुरु रामदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने 'व्ही डिमांड जस्टीस फोर सिद्धू मूसेवाला' अशी मागणी करणारे मोठे बॅनर लावण्यात आले.

उपस्थितांच्या वतीने त्यांनी श्रद्धांजली अर्पण करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शरणसिंग गिल करणसिंग गिल, कुलविंदर गहीर,आशिष कालरा, विक्रम साळवे कुलदीप औलख, समेशरसिंग गिल उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...