आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशास्त्राच्या चौकटीत राहूनही कलाकाराला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देणारे अभिजात भारतीय संगीत हे देश-विदेशातील कलाकार, संगीतप्रेमींच्या कुतूहलाचा विषय राहिले आहे. यापैकी काही कलावंतांचा वेध घेऊन स्वातंत्र्याच्या अमृतकाळाच्या निमित्ताने त्यावर आधारित ‘मुसाफिर’ हा एक दृकश्राव्य कार्यक्रम शनिवारी (दि. १२) हाेत आहे. शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभागातर्फे त्याचे आयाेजन करण्यात आले आहे.
गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलातील कुर्तकोटी सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम हाेणार आहे. भारतीय संगीत आणि नृत्यपरंपरेचा परिचय प्राचीन काळापासून जगाला झालेला आहे. अनेक कलाकार विविध देशांत गेले. तसेच बरेच भारतात आले. इथल्या परिस्थितीशी जुळवून घेत, गुरू-शिष्य परंपरेतील ताणेबाणे स्वीकारत, समर्पण भावाने हे कलावंत हिंदुस्तानी आणि कर्नाटक संगीत, विविध शैली आणि घराण्याचे नृत्य, धृपदसारखी पारंपरिक गायकी आणि रुद्रवीणेसारखे अनवट वाद्य शिकले.
त्यांच्यापैकी काहींनी येथेच मुक्काम ठोकला. भारतीय जीवन शैलीशी ते एकरूप झाले अशा निवडक पाच कलाकारांवर आधारित असा हा कार्यक्रम आहे. कार्यक्रमासाठी संशोधन आणि संहितालेखन वंदना अत्रे यांनी केले असून अभिवाचनात त्यांना अनंत येवलेकर साथ देणार आहेत. संगीत तसेच नृत्यप्रेमींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून या अनोख्या अनुभवाचे वाटेकरी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.