आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधी:संगीत अभ्यासक्रम, प्रवेशास 28 पर्यंत संधी

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात सन २०२२ व २०२३ या शैक्षणिक वर्षासाठी विविध सहा प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना २८ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश अर्ज करता येईल. ऑनलाइन स्वरूपात प्राप्त झालेल्या अर्जांमधून विद्यार्थ्यांचे ऑडिशन घेण्यात येईल. त्या आधारावर प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येतील.

सध्या सर्व अभ्यासक्रम तात्पुरत्या स्वरूपात पु. ल. देशपांडे अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे डिसेंबर २०२२ पासून सुरू होणार आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, भारतीय बासरीवादन, तबलावादन, सतारवादन, पियानो, किबोर्ड, संगीत निर्मिती व ध्वनी अभियांत्रिकी या सहा अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. एक वर्ष कालावधीच्या या अभ्यासक्रमांबाबत अधिक माहिती www.doa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करावे, असे आवाहन प्र. कला संचालक प्रा. वि. डो. साबळे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...