आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीत खुर्ची अन् स्केटिंग स्पर्धा:लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाने पटकावले अजिंक्य पद

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा या अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित 19 वर्षाखालील मुले व मुली म्युझिकल चेअर व स्केटिंग म्युझिकल चेअर स्पर्धेत लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाने जवळ-जवळ सर्व गटात अजिंक्य पद प्राप्त करून विक्रम केला.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे 19 वर्षाखालील मुले व मुली म्युझिकल चेअर व स्केटिंग म्युझिकल चेअर स्पर्धा झाल्या. या स्पर्धेमध्ये अनेक महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेत लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या महिला गटाच्या 38 ते 41 कि.ग. गटात सोनाली गुंबाडे, 41 ते 44 कि.ग. ज्योती चतुर्वेदी, 44 ते 47 कि.ग. सानिया बोहरा, 47 ते 50 कि.ग. ममता शिर्के, 50 ते 54 कि.ग. कुमकुम मोरे, 54 ते 58 कि.ग. दिव्या निशाद, 58 ते 62 कि.ग. अक्षदा तालखे, 62 ते 66 कि.ग. मैत्री अहिरे यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवून अजिंक्य पद प्राप्त केले.

तसेच स्केटिंग म्युझिकल चेअर स्पर्धेत 47 ते 50 कि.ग. गटात अश्विनी पाटील, 54 ते 58 कि.ग. गटात नंदिनी सपकाळे, 58 ते 62 कि.ग. गटात नेहा पगारे यांनी प्रथम क्रमांक मिळवून अजिंक्य पद प्राप्त केले.

तसेच पुरुष संघाने देखील घवघवीत यश प्राप्त केले. पुरुष गटात पुढील प्रमाणे 44 ते 47 कि.ग. आर्यन पवार, 47 ते 50 कि.ग. तेजस बोरसे, 50 ते 54 कि.ग. पियुष तिवारी, 54 ते 58 कि.ग. दिपेश चव्हाण, 58 ते 62 कि.ग. ओम निकम, 62 ते 66 कि.ग. कार्तिक गवळी, 66 ते 70 कि.ग. मकरंद कुमावत, 70 ते 74 कि.ग. अमन विश्वकर्मा यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवून अजिंक्य पद प्राप्त केले.

सर्व यशस्वी खेळाडू व संघाचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे, कर्मवीर भाऊसाहेब हिरे ग्रुप चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अपूर्व हिरे, विश्वस्त संपदा हिरे, महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा डॉ. योगिता हिरे, प्राचार्य डॉ. बी.एस. जगदाळे, यांनी अभिनंदन केले. संघातील खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. किशोर राजगुरू, प्रा. डॉ. संतोष पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...