आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आता जूनमध्ये

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसापासून वादात अडकलेले अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन अखेर दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य आणि सांस्कृतिक संस्थेच्या कार्यकारिणीने नुकताच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. नाशिकमध्ये २५, २६ आणि २७ मार्चला अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, मार्च ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत विविध परीक्षांचा कालावधी असणार आहे. यात दहावी- बारावीची परीक्षा सुरू देखील झाल्या आहेत. त्यातच, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसगाड्यांची संख्याही कमी आहे.

याशिवाय, एप्रिल-मेदरम्यान रमजान पर्वदेखील येत आहे. अशा पार्श्वभूमीवर संमेलनासाठी येणाऱ्या साहित्यिक रसिक व नागरिकांना अडचणी भासू शकतात. या सर्वांचा विचार करता संमेलन दोन महिने पुढे ढकलण्यात आले आहे. आता, जूनमध्ये संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष तन्वीर खान तंबोली यांनी दिली. त्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल व जूनमधील तारखा निश्चित करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...