आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहक न्यायालयाचा भरपाई देण्याचे आदेश:ट्रॅक्टरचा परस्पर लिलाव; नुकसानभरपाईचे आदेश

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रॅक्टरचे कर्ज थकल्याने वसुली एजंटकडून ट्रॅक्टर अोढून नेत शेतकऱ्याला नोटीस न देता ट्रॅक्टरचा लिलाव करण्यात आला. या प्रकरणी कोटक महिंद्रा बँकेला ग्राहक न्यायालयाने ६५ हजार रुपये नुकसानभरपाई शेतकऱ्याला देण्याचा ग्राहक न्यायालयाने आदेश दिला. ग्राहक न्यायालयाच्या निकालानुसार शिवाजी सांगळे (रा. डोंगरगाव, ता. निफाड) यांनी कोटक महिंद्रा बँकेकडून ४ लाख ४६ हजारांचे कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला हाेता. ८ हप्त्यांची ३ लाख ९१ हजार रुपयेे रक्कम भरत कर्जाची परतफेड केली होती. पाच हप्ते बाकी होते. यातील दोन हप्ते आर्थिक अडचणीमुळे थकले होते. हप्ते भरण्यास शेतकरी तयार हाेता मात्र कर्ज थकल्याने बँकेने ट्रॅक्टर अोढून नेला. सांगळे बँकेत गेल्यानंतर ट्रॅक्टरचा परस्पर लिलाव करत विक्री केल्याचे समजले.

शिवाजी सांगळे यांनी ग्राहक न्याय मंचामध्ये ट्रॅक्टर अथवा कर्जाची रक्कम परत मिळावी, याकरिता अर्ज केला होता. न्याय मंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य सचिन शिंपी, प्रेरणा काळुंखे यांनी ट्रॅक्टरचा घसारा वजा करत शेतकऱ्याचे तीन लाख ९२ हजार कर्जाच्या रकमेमधून कर्जाचे ३ लाख २७ हजार वजा जाता ६५ हजार रुपये शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...