आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारंपरिक बाजारपेठेत ‘मायमराठी’:नव्या बाजारात मात्र इंग्रजीतच पाटी, राज्य सरकारने दिलेली मुदत संपली

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सर्व दुकाने, आस्थापना यांना त्यांचे नामफलक मराठी भाषेत लावण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर त्यासाठी ३१ मे ही मुदत दिली होती, ती संपली असून शहरातील ८० टक्के दुकानांवर इंग्रजी भाषेतच फलक आहेत. विशेष म्हणजे नोटीस मिळाल्यानंतर पाच दिवसांत फलक बदला या सूचनेकडेही दुकानदारांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. तर आता एक लाखापर्यंतचा दंडही व्यावसायिकांना होऊ शकतो. या सर्व स्थितीचा शहरातील सहा विभागांमध्ये ‘दिव्य मराठी’ने केलेला हा ग्राउंड रिपोर्ट...

काय म्हटले आहे अधिसूचनेत मुळात राज्यसरकारने निर्णय घेतल्यानंतर दुकाने, आस्थापना चालकांनी स्वत:हुन तत्काळ मराठी नामफलक लावणे बंधनकारक झाले आहे. या अधिसूचनेनुसार नामफलकात मराठी टंक सर्वात मोठा असावा, इतर भाषेपेक्षा तो कमी असता कामा नये. मद्यविक्री दुकानांच्या नामफलकांवर कुठेही गड-किल्ले, महनीय व्यक्ती यांचे नाव लिहीता येणार नाही असे या अधिसुचनेत स्पष्ट केले गेले आहे

तर दंडात्मक कारवाई होणार ^आत्तापर्यत १५०० दुकानांची तपासणी करून नामफलकांवर मराठी नाव नसलेल्या किंवा मराठीत नाव आहे पण इतर भाषेतील नावापेक्षा लहान टंक असल्याचे आढळून आलेल्या १८७ आस्थापनांना यात तातडीने बदल करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नामफलकात बदल करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास १ लाख रूपयांपर्यंतच्या किंवा प्रती कामगार २ हजारापर्यंतच्या दंडाची तरतूद असून या दंडानंतरही सुधारणा केली नाही तर मात्र दरदिवशी २ हजार रूपयांचा दंड आकारण्याची तरतूद आहे. - विकास माळी, कामगार उपायुक्त, नाशिक

{नाशिक शहरात जवळपास १ लाख ५० हजार नोंदणीकृत दुकाने व आस्थापना {जिल्ह्यात हीच संख्या २ लाख ५० हजार आहे. {आत्तापर्यंत १५०० दुकानांची तपासणी, १८७ ठिकाणी अनियमिततेमुळे नोटीसा {इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल दुकाने, बॅकांचे नामफलक इंग्रजीत {नामफलक बदलण्यासाठीची मुदत ३१ मेला संपली, आता दंडाला सामोरे जावे लागणार {मराठीत नामफलक नसल्यास होऊ शकतो प्रती कर्मचारी २ हजार किंवा कमाल २ लाख रुपयांचा दंड

पंचवटी : ९०% फलक मराठीत, इंग्रजीचे टंक छोटे पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड, पेठनाका, दिंडोरीरोड, निमाणी परिसर येथे मराठीचा बोलबाला असून येथे ९० टक्के नामफलक हे केवळ मराठीतच आहेत. ५ टक्के नामफलकांवर मराठी मोठे तर इंग्रजी छोटे टंक दिसून येतात तर ५ टक्के फलक हे पूर्णपणे इंग्रजीत आहेत. दिंडोरीनाका ते जुना मखमलाबादनाका, मालेगाव स्टॅण्ड, कपालेश्वर मंदिर परिसर, पंचवटी कारंजा, निमाणी बस-स्थानकासमोरचा परिसर येथे प्रत्यक्ष पाहणीत हे निरीक्षण समोर आले.

नाशिकरोड : ९४% फलक दोन्ही भाषांत नाशिकरोड येथे मुख्य बाजारात ९४ टक्के दुकानांचे फलक हे इंग्रजी आणि मराठी या भाषेमध्ये दिसून आले. केवळ दाेन ते तीन टक्के नामफलक इंग्रजी भाषेतील आहेत. सात टक्के नामफलक मराठी भाषेत आहेत. बहुतांशी फलके इंग्रजी आणि मराठी भाषेतून होते. यामध्येही इंग्रजी अक्षर मोठे होते तर मराठीचे अक्षरही लहान आकारात दिसून आले.

नाशिक पूर्व : ५० % इंग्रजी, ३०% मराठीत पूर्व प्रभागातील जुने नाशिक, दूधबाजार, सारडा सर्कल ते गंजमाळ, गडकरी चौकापर्यंतच्या परिसरात सर्वाधिक म्हणजे, ६० टक्के नामफलक इंग्रजी भाषेतील आहेत. विशेषत: सारडा सर्कल ते गडकरी चौकापर्यंतच्या परिसरात हे प्रमाण सर्वाधिक आहे. द्वारका, काठे गल्ली या परिसरात अवघे ३० टक्के फलक पूर्ण मराठी भाषेतील आहेत. मुस्लिमबहुल परिसरात इंग्रजीचा वापर जास्त असल्याचे प्रकर्षाने जाणवले.

नाशिक पश्चिम : ५०% पाट्या इंग्रजीत पश्चिम प्रभागात रविवार कारंजा, सराफ बाजार, भांडी बाजार, दहिपूल, मेनरोड, अशोकस्तंभ परिसरात ८० टक्के फलक फक्त मराठीत दिसतात. मात्र, एमजी रोड, वकीलवाडी, गोळे कॉलनी भागात ९० टक्के पाट्या केवळ इंग्रजीत आहेत. कॉलेजरोड, समर्थनगर, महात्मानगर, जुना गंगापूरनाका ते जेहान सर्कल या भागात मात्र मराठीचे वावडे दिसते. येथे ८० टक्के फलक

बातम्या आणखी आहेत...