आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्वी जीवनाच्या पंचसूत्रीचा मॅनेजमेंट फंडा:रागातून मुक्तता मिळवण्याचा एन. रघुरामन यांनी दिला मंत्र

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूल्याधिष्ठित व्यवस्था, सर्जनशीलता, नेतृत्वगुणांचा विकास, छोट्या छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंद आणि रागातून मुक्तता मिळवण्याची पद्धती..या पंचसूत्रीतून मॅनेजमेंटगुरू एन. रघुरामन यांनी शरीरसोबतच मनाची शांती अन् आत्मा यांचे व्यवस्थापन करण्याचा फंडा नाशिककरांना सांगितला.दिव्य मराठीतर्फे रविवारी (दि. २) कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात मॅनेजमेंटगुरू एन. रघुरामन यांचा लाइव्ह मॅनेजमेंट फंडा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शरीर, मन आणि आत्मा यांचे व्यवस्थापन ही एक कला आहे. या विषयावर त्यांनी संवाद साधला. टाईम मॅनेजमेंट कसे करायचे? असे अनेक प्रश्न मला विचारले जातात, मात्र, आपण आपल्या मनावर नियंत्रण मिळवून त्याचे योग्य व्यवस्थापन करू शकलो तर तणाव कमी होण्यास मदत होते.

भारतातील मूल्य व्यवस्था घटत असल्याने ते ही तणाव वाढण्याचे मोठे कारण आहे. मानसिक तणावांमुळे सर्जनशील विचार आणि नावीण्यपूर्णता कमी होत आहे. जो व्यक्ती फक्त पैशांच्या मागे धावतो तो कधीही श्रीमंतीची शाश्वती प्राप्त करू शकत नाही. तर जो व्यक्ती मूल्य सांभाळतो तो खऱ्या अर्थाने धनवान होतो. आपल्या कार्यक्षेत्रात चाैकटी पलिकडला विचार केल्यास आपण नवीन कल्पना प्रत्यक्षात साकारू शकतो, असे ते म्हणाले.

ही आहे पंचसूत्री संस्कार, नीतीमूल्ये यांची शिकवण देणारी मूल्याधिष्ठित व्यवस्था, सकारात्मकेतून वाढणारा सर्जनशील विचार, अडचणींवर उपाय शोधणारे नेतृत्व आणि आनंद निर्माण करणारे क्षण, घटना, वातावरण या पंचसूत्रीच्या अनुकरणातून जीवनात शाश्वत आनंद प्राप्त करता येतो.