आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच:नायब तहसीलदाराला 25 हजार रुपये लाच घेताना पकडले, कोतवालाने रक्कम घेऊन दिली नायब तहसीलदाराला

लासलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमीन बिनशेती करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या निफाड येथील निवासी नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांना बुधवारी काेतवाल अमोल राधाकृष्ण कटारेमार्फत ३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. प्रशासकीय कार्यालयातील प्रसाधनगृहामध्ये कोतवाल लाच घेत असताना ही कारवाई करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी सापळा रचला होता. निवृत्तीला पाच महिने बाकी असताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात निवासी नायब तहसीलदार अडकल्याने निफाड तालुक्यात खळबळ उडाली आहे. पिंपळगाव नजीक येथील जमिनीबाबत तक्रारदार शेतकऱ्याने लाचलुचपत प्रति ध कार्यालयात तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा लावत बुधवारी दुपारी ४ वाजता ही कारवाई केली. तक्रारदार यांच्याकडे ४० हजार रुपयांची मागणी केली होती, मात्र तडजोडीनंतर ३५ हजार रुपये देण्याचे ठरले. दुपारी ४ वाजेच्या दरम्यान निकुंभ यांना कोतवाल कटारेमार्फत ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक राहुल बागूल, पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांनी पंचांसह ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...