आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर पावसाळ्यापूर्वी उद्योगांना दिलासा:नाशिक एमआयडीसीती नाले सफाईला सुरुवात;  अनेक कंपन्यांमध्ये पाणी सुरू, यापूर्वी लाखोंचे नुकसान

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक अंबड औद्याेगिक वसाहतीत सुरू झालेली नालेसफाईची कामे. - Divya Marathi
नाशिक अंबड औद्याेगिक वसाहतीत सुरू झालेली नालेसफाईची कामे.

नाशिक मधील अंबड औद्याेगिक वसाहतीतील नालेसफाईला अखेर महापालिकेकडून सुरुवात झाली आहे. यामुळे सखल भागात कंपन्यांमध्ये पाणी घुसून होणारे संभाव्य नुकसान टाळता येणे शक्य होणार आहे. यावर्षी नालेसफाईचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

नागरिकांना दिलासा

वास्तविक पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून महापालिकेकडून न चुकता ही नालेसफाई हाेणे अपेक्षीत असते. मात्र, दरवर्षी उद्योजकांची संघटना असलेल्या आयमाला याकरीता महापालिकेकडे पत्रव्यवहार करावा लागतो आणि अगदी पावसाळ्याच्या तोंडावर घाई घाईने ही सफाई हाेत असते. यंदा मात्र वेळेत सफाई सुरू झाली असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

यागोदर झाले आहे लाखोंचे नुकसान

अंबड औद्याेगिक वसाहत डाेंगराच्या पायथ्याशी वसलेली असल्याने तसेच येथील नैसर्गिक नाल्यांना बंदिस्त केले गेल्याने त्यांचा संकाेच झालेला आहे. यामुळे मोठा पाऊस आला तर खालच्या भागातील कंपन्यांमध्ये थेट पाणी शिरते. यामुळे, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा झाल्या आहेत.

महापालिकेने लक्ष घालावे

कंपन्यांचा कच्चा माल, उत्पादीत माल, मशिनरी पाण्यात बुडाल्याच्या तक्रारी उद्याेजकांकडून झाल्या आहेत. यामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या किमान महिनाभर अगोदर महापालिकेने नालेसफाईचे काम पुर्ण करणे अपेक्षीत आहे. मात्र, याकरिता उद्याेजकांची संघटना आयमाला पत्रव्यवहार करावा लागताे, त्यानंतर महाापालिकेला जाग येते अशी दुर्दशा येथे दिसुन येते. आता हे काम सुरू झालेले असून अजुन बऱ्याच ठिकाणी ते हाेणे बाकी आहे. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गरज पडेल तेव्हा मदत पुरवण्याची तयारी उद्याेजकांना दर्शविली असल्याचे

झाडांच्या फांद्या तशाच आहेत पडून

पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून महावितरणने वीजतारांना स्पर्श हाेऊ नये याकरीता आवश्यकतेनुसार या औद्याेगिक वसाहतीत विविध रस्त्याच्या कडेच्या झाडांच्या फांद्या तोडल्या. हे काम पुर्ण हाेऊन बरेच दिवस झाले असले तरी महापालिकेकडून हया फांद्या, खाली पडलेला पाला पोचोळा उचलेला नाही. अशा परिस्थितीमुळे मात्र अपघात हाेण्याची भीती काही ठिकाणी वाढली आहे.

आज होणार आढावा

पायाभूत समितीचे चेअरमन हेमंत खोंड म्हणाले की, तीन दिवसांपासून महापालिकेने नालेसफाईचे काम हाती घेतले असून यंदा उद्याेगांना त्रास कमी हाेण्याची शक्यता आहे. झालेल्या कामाचा आढावा उद्या, मंगळवारी आयमाचे पदाधिकारी व महापालिकेचे अधिकारी यांच्याकडून घेतला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...