आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषणाचा विळखा:गंगापूर रोडवर नाल्यांचे पाणी थेट गोदा नदीत; मनपाच्या दुर्लक्षाने संताप

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोदावरी नदी प्रदूषणुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा देखावा महापालिका वारंवार करीत आली आहे. त्यात आता शहरातील विविध ठिकाणी नाले, गटारींचे सांडपाणी थेट गोदापात्रात मिसळत असल्याचे चित्र आहे.

मागील काही दिवसांपासून गंगापूर रोडवरील अरिहंतनगर भागातील निर्मला शाळेसमोर ड्रेनेज तुंबल्याने या सर्व गटारीचे पाणी गोदापात्रात येत असल्याचे चित्र आहे. यामुळे आता पुन्हा गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात अडकू लागली आहे. गटारीचे पाणी थेट गोदापात्रात जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. यासंदर्भात काही नागरिकांकडून वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्यानंतरदेखील उपाययोजना केल्या जात नसल्याची स्थिती असून, हे चित्र नेमके बदलणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे मध्य नाशिक अध्यक्ष किशोर शिरसाट, सचिन जोशी, स्वप्निल सातपुते, सतीश कौल, दीपा धारणकर, किरण अहिरे, आदर्श नायर, अनिल भिडे, अनिल सोनवणे, तिवारी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...