आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:नाव रोजगार मेळाव्याचे; प्रत्यक्षात साेहळा निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तिपत्र वितरणाचा

किशोर वाघ | नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाच्या तसेच महामंडळाच्या आस्थापनांमध्ये यापूर्वीच निवड झालेल्या परंतु अद्यापही नियुक्तिपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला असून, त्याचे नामकरण मात्र रोजगार मेळावा करून शासनाकडून जणू बनवाबनवी केली जात आहे. म्हणजे नाव रोजगार मेळाव्याचे अन् प्रत्यक्ष नियुक्तिपत्र देण्याचा उपक्रम शासनाकडून आयोजित करण्यात आला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रोजगार मेळावे, स्टार्टअप मेळावे आणि इतरही अनेक उपक्रम राबविले जात आहेत. परंतु, पंतप्रधानांनी अमृत महोत्सवांतर्गत ७५ हजार बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा केल्यानंतर ती सत्यात उतरविण्यासाठीच हा मेळावा आयोजित केला आहे. परंतु या मेळाव्यात प्रत्यक्षात बेरोजगारांना नोकरी नव्हे तर यापूर्वीच २-४ वर्षांपासून अभ्यास करणारे, खडतर कष्ट करून शासकीय सेवेत निवड झालेल्या उमेदवारांना नोकरी ही मिळणारच होती. खरेतर लेखी परीक्षा, मौखिक परीक्षा आणि वैद्यकीय तपासण्यांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तत्काळ निवड पत्र देणे अपेक्षित असताना या उमेदवारांना त्यासाठी प्रतीक्षा करावी लागली अन् आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ हजार जणांना नोकरी देण्याच्या आश्वासनाची पूर्ती केली जात असल्याचेच शासनाकडून भासविले जात आहे.

मुंबईत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री तर जिल्ह्यात पालकमंत्री देणार नियुक्तिपत्र
संपूर्ण राज्यभर एकाच दिवशी हा निवड पत्र देण्याचा सोहळा अर्थात शासनाचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. निवड पत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पत्र दिले जाणार आहे. तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, विभागीय स्तरावर पालकमंत्र्यांच्या हस्ते हे पत्र दिले जाईल.

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या मेळावा
नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ३ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता हा मेळावा पार पडेल. तरी संबंधित इच्छुक उमेद्वारांनी प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असेही महाजन यांनी कळविले आहे.

नाशिक विभागातील ४५० उमेदवारांचा समावेश
विभागातील ४५० उमेदवारांची शासनाच्या विविध विभागांत रिक्त जागांवर निवड झाली आहे. त्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्तिपत्र दिले जाईल. त्यात एस.टी. महामंडळाचे चालक-वाहक व एमएसइबीच्या विद्युत सहायक पदांवरील उमेदवारांची संख्या अधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...