आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nameplate Placed Near Kapila River, Eminent Water Expert Dr. Rajendra Singh Got Recognition, Success In Many Years Of Struggle, Historical And Mythological Significance Of The River

संवर्धन होणार कधी?:कपिला नदीजवळ अखेर पालिकेचा नामफलक, प्रख्यात जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र सिंह यांनीही केले होते आवाहन

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पौराणिक महत्व असलेल्या कपिला नदीला आता पुन्हा एकदा ओळख मिळाली आहे. नदीवर नाशिक महापालिकेने नामफलक लावलाय. त्यामुळे विस्मरणात गेलेल्या कपिला नदीची नाशिककरांसह देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना माहिती मिळणार आहे.

फलक लावण्याची होती मागणी

अनेक वर्षापासून नदीच्या नावाचा फलक लावण्यात यावा अशी मागणी कपिला नदी संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आली होती. याची दखल घेत पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राबडिया यांनी फलक लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. समितीच्या वतीने नदीच्या किनारी वृक्षारोपण करण्यात आले आहे.

अशी आहे आख्यायिका

कपिला नदीला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व आहे. कपिला मुनींनी काही काळ या ठिकाणी वास्तव्य केले असल्याचा उल्लेखही पौराणिकात आला आहे. नदीच्या नावाचा फलक लावण्यात यावा, अशी मागणी कपिला नदी संवर्धन समितीने महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांकडे करण्यात आली होती.

डाॅ. राजेंद्र सिंहांचेही आवाहन

जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र सिंह यांनीही कपिला नदीला ओळख निर्माण व्हावी याकरिता आवाहन केले होते. यास प्रतिसाद देत निशिकांत पगारे, यांना तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांना निवेदन देत हा लढा सुरू केला होता. नदीला ज्या ठिकाणी प्रारंभ झाला त्या ठिकाणी फलक लावण्याची मागणी केली होती.

दहा वृक्ष लावले

पर्यावरण प्रेमींनी नदीच्या किनारी 10 वृक्ष लावून कपिला नदी नामकरणाच्या फलकाचे अनावरण केले. विभागीय अधिकारी कैलास राबडिया, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांचे सहकार्य लाभले. समितीचे अध्यक्ष योगेश बर्वे, दीपक बैरागी, सुनील परदेशी, रोहित कानडे, प्रकाश बेळे यांच्यासह पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

कपिला नदीचा उगम

कपिला नदीचा सिंधी नाला, ते आडगाव ओहळ यांचा साई नगर शिंदे मळा येथे संगम होतो. पुढे नदीपात्र एक होऊन कपिला नदी म्हणून ओळखली जाते. बारा महिन्यांतील आठ महिने नदी वाहते. अनेक वर्षापासून या नदीला नाला म्हणून ओळखले जात होते. आता फलक लागल्याने नदीला खऱ्या अर्थाने नाव मिळाल्याची भावना निशिकांत पगारे यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...