आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद:नानेगावी बिबट्या अलगद पिंजऱ्यात

देवळाली कॅम्पएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नानेगाव येथे गेल्या महिनाभरापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. नाणेगाव येथे मंगळवारी (दि. ६) रात्री शिंदे मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात नरजातीचा चार वर्षांचा बिबट्या अलगद अडकला. मळ्यांमध्ये मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याने बकऱ्या, वासरे, कुत्रे यासह पाळीव प्राण्यांचा फडशा पाडलेला असताना सायंकाळी सात वाजेनंतर ग्रामस्थ मळ्यात फिरकणे बंद झाले हाेते.

दरम्यान अजूनही वंजारवाडी, लहवित, लोहशिंगवे, भगूर विजयनगर, दारणा पंपिंग स्टेशनरोड, राहुरी, दोनवाडे, नानेगाव, शेवगेदारणा, देवळाली कॅम्प बार्न्स स्कूल परिसर या भागात बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...