आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेडकोच्या 'होमेथॉन 2022 प्रॉपर्टी एक्स्पो' प्रदर्शन:22 डिसेंबरला शुभारंभ; 15 लाखांपासून 4 कोटींपर्यंतचे घर घेण्याची संधी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे नाशकातील सगळ्यात भव्य प्रॉपर्टी एक्झिबिशन " होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो" प्रदर्शन २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन नरेडकोचे व्हाईस प्रेसिडेंट आणि बांधकाम क्षेत्रातील अर्ध्वयू डॉक्टर निरंजन हिरानंदानी आणि नरेडको नॅशनल प्रेसिडेंट राजन बांदेलकर यांच्या हस्ते होणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार तसेच नरेडकोच्या होमथॉन एक्स्पो २०२२ या प्रदर्शनाची ब्रँड ॲबेसॅडर अभिनेत्री प्राजक्ता माळी ती देखील या प्रदर्शनाला भेट देणार आहेत.अशी माहिती नरेडको अध्यक्ष अभय तातेड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हे प्रदर्शन म्हणजे एकप्रकारची पर्वणीच असून नाशिक, मुंबईसह नाशकातील नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली बघण्याची व ती खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे नागरीकांना उपलब्ध होईल,अल्प व मध्यम उत्पन्नगटातील लोक केंद्रबिंदू धरून अगदी १५ लाखांपासून ते ४ कोटी रुपया पर्यंतची घरे या प्रदर्शनात नागरीकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.अशी माहिती नरेडकोच्या प्रदर्शनाचे समन्वयक जयेश ठक्कर यांनी सांगितले

हे प्रदर्शन ४ डोममध्ये उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून त्यात १२५ हून अधिक स्टॉल्स असतील. बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक साहित्ये यांये स्टॉल्सही येथे असतील कोणत्याही स्टॉल वर घर बुक करणाऱ्यास लगेचच नरेडको तर्फे चांदीचे नाणे भेट देण्यात येणार आहे.तसेच प्रदर्शनास भेट देण्यास येणाऱ्यांचीही नरेडको तर्फे लकी ड्रॉद्वारे भाग्यवंताला चांदीचं नाणं दररोज मिळणार आहे असे नरेडको चे सचिव सुनील गवादे यांनी सांगितले.

प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे असून सह प्रायोजक म्हणून सिटी लिफ्ट, इन्व्हेरो,केनेस्ट यांचे सहकार्य मिळाले असून घर घेण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ही नरेडकोची बँकिंग पार्टनर असून एचडीएफसी आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक आदी बँकांतर्फे कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही मात्र प्रवेशकरण्यापूर्वी नागरीकांना क्यू आर कोड द्वारे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.हे प्रदर्शन डोंगरे वसतिगृह मैदानावर २२ ते २५ डिसेंबर पासून नागरीकांना खुले असून जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन प्रदर्शनाचे सह समन्वयक शंतनू देशपांडे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेस समन्वयक शंतनू देशपांडे, पुरुषोत्तम देशपांडे, भाविक ठक्कर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...