आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:नरेडकोच्या होमथॉन प्रॉपर्टी प्रदर्शनाचा आज शुभारंभ ; 25 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत प्रदर्शन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको)च्या “होमथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (दि. २२) नरेडकोचे व्हाइस प्रेसिडेंट आणि बांधकाम क्षेत्रातील अध्वर्यू डाॅ. निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते होणार आहे. नरेडकोचे नॅशनल प्रेसिडेंट राजन बांदलकर यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड आणि समन्वयक जयेश ठक्कर यांनी दिली.

सर्वसामान्यांच्या स्वप्नातील व वाजवी दराच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत हे प्रदर्शन गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सीमा हिरे,विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डी. गंगाधरन, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे दीपक चंदे असून सहप्रायोजक म्हणून सिटी लिफ्ट, इन्व्हेरो, केनेस्ट यांचे सहकार्य मिळाले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन नरेडकोचे सचिव सुनील गवादे, सहसचिव शंतनू देशपांडे यांनी केले आहे. होमथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो २०२२ यशस्वी होण्यासाठी अविनाश शिरोडे, पुरुषोत्तम देशपांडे,राजेंद्र बागड भाविक ठक्कर, अश्विन आव्हाड, प्रशांत पाटील, नितीन पाटील, मयूर कपाटे, भूषण महाजन, श्रीहर्ष घुगे प्रयत्नशील आहेत.

१५ लाखांपासून ४ कोटी रुपयांपर्यंतची घरे प्रदर्शनात : अपार्टमेंट्स, शॉप्स, ऑफिसेस यासाठी स्मार्ट सिटी नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य संधी आहे. १५ लाखांपासून ते ४ कोटी रुपयांपर्यंतची घरे या प्रदर्शनात आहेत. त्यामुळे रिअल इस्टेट आणि ग्राहक दोघांनाही याचा फायदा होणार आहे.

विशेष सवलती, बुकिंगवर चांदीचे नाणे बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना येथे विशेष सवलती असतील, बँकिंग पार्टनर्सदेखील ग्राहकांना विशेष सवलत देणार आहेत. स्पॉट बुकिंग करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला एक चांदीचे नाणे या ठिकाणी भेट मिळणार आहे. जितके लोक एक्झिबिशन बघायला येतील त्यापैकी एका भाग्यवंताला दररोज दर तासाला तेजस्वी ज्वेलर्सतर्फे लकी ड्रॉद्वारे चांदीचे नाणे मिळणार आहे.

होमथॉन प्रदर्शनातून घराचे स्वप्न होणार साकार : दीपक चंदे नाशिक महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या जवळ, सांस्कृतिक पुण्याच्या शेजारी, समृद्धी महामार्गाच्या जाळ्यात असलेल्या सुवर्ण चतुष्कोनातील नाशिक हे महत्त्वाचे शहर आहे. येथील हवामान हे कायम निवासाकरिता आरोग्यदायी असून सातत्याने आैद्याेगिक वाढ होत असल्याने बाहेरगावच्या नागरिकांचा नाशिकमधे स्थायिक होण्याचा कल वाढलेला आहे. नरेडको आयोजित होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पोमधून नाशिककरांचे घराचे स्वप्न नक्कीच साकार हाेणार असल्याचा विश्वास या प्रदर्शाचे मुख्य प्रायोजक आणि दीपक बिल्डर्सचे सर्वेसर्वा दीपक चंदे यांनी व्यक्त केला आहे.

अपार्टमेंट्स, शॉप्स, ऑफिसेस यासाठी स्मार्ट सिटी नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य संधी आहे. नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प एकाच छताखाली ग्राहकांना नरेडकोच्या प्रदर्शनात बघायला मिळ66णार आहेत. ग्राहकांना इथे विशेष सवलती असतील, बँकिंग पार्टनर्स ग्राहकांना सवलत देणार आहेत. बांधकाम मटेरियल, इंटेरिअर मटेरियलचे स्टॉलदेखील येथे असणार असल्याचे चंदे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...