आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नरेडकोच्या होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो तून घराचे स्वप्न हाेणार साकार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे नाशकातील सगळ्यात भव्य प्रॉपर्टी एक्झिबिशन “होमथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” प्रदर्शन २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. नाशिक, मुंबईसह नाशकातील नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली बघण्याची व ती खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे नागरिकांना उपलब्ध होईल.

प्रदर्शनाचे उद्घाटन नरेडकोचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. निरंजन हिरानंदानी आणि नरेडको नॅशनल प्रेसिडेंट राजन बांदेलकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित असतील. होमथॉपची ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेत्री प्राजक्ता माळीदेखील प्रदर्शनाला भेट देणार असल्याची माहिती माहिती नरेडको अध्यक्ष अभय तातेड यांनी पत्रकार परिषदेत दिली. अल्प व मध्यम उत्पन्नगटातील लोक केंद्रबिंदू धरून अगदी १५ लाखांपासून ते चार कोटी रुपयांपर्यंतची घरे या प्रदर्शनात नागरिकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती नरेडकोच्या प्रदर्शनाचे समन्वयक जयेश ठक्कर यांनी सांगितले प्रदर्शन चार डोममध्ये उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून त्यात १२५ हून अधिक स्टॉल्स असतील.

कोणत्याही स्टॉलवर घर बुक करणाऱ्यास लगेचच नरेडकोतर्फे चांदीचे नाणे भेट देण्यात येणार आहे. प्रदर्शनास भेट देण्यास येणाऱ्यांचीही लकी ड्रॉद्वारे भाग्यवंताला चांदीचं नाणं दररोज मिळणार आहे, असे नरेडकोचे सचिव सुनील गवादे यांनी सांगितले. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे असून सहप्रायोजक म्हणून सिटी लिफ्ट, इन्व्हेरो, केनेस्ट यांचे सहकार्य मिळाले असून घर घेण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ही नरेडकोची बँकिंग पार्टनर असून एचडीएफसी आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक आदी बँकांतर्फे कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

प्रदर्शनात जमा झालेला प्लॅस्टिकचा कचरा वापरणार बांधकामासाठी
नरेडकोच्या “ होमथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” प्रदर्शनात सामाजिक बांधिलकी म्हणून एक अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे. प्रदर्शनामध्ये जमा झालेला प्लॅस्टिकचा कचरा पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये भरला जाणार असून या बॉटल्स ग्रामीण भागात बांधकामासाठी वापरल्या जाणार आहे.सामाजिक बांधिलकीतून उपक्रम राबवणारी नरेडको ही पहिलीच संस्था असणार असल्याचे नरेडकोचे सेक्रेटरी सुनील गवादे यांनी सांगितले. यावेळी, समन्वयक शंतनू देशपांडे, पुरुषोत्तम देशपांडे, भाविक ठक्कर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...