आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवेळी सरकारकडे हात का पसरता!:साहित्य संमेलनाच्या खर्चावर नरेंद्र चपळगावकरांनी साहित्य महामंडळ पदाधिकाऱ्यांचे पिळले कान

पीयूष नाशिककर | महात्मा गांधी साहित्य संमेलननगरी, वर्धा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''वर्धा येथील साहित्य संमेलनाचा खर्च अंदाजे तीन ते चार काेटी रुपये सांगण्यात येताे. त्यात सरकारने तीन दिवसांपूर्वीच दाेन काेटी रुपये दिले आहे. हा खर्च हा डामडाैल बघून साहित्य संमेलन कमी खर्चात करायला हवे. साहित्याचा हा संसार उभा करायचा पैसा दरवेळी सरकारला का मागायचा? आपली परिस्थिती बऱ्यापैकी आहे. असे सांगत काही बाबींचा धागा धरत अत्यंत संयत शब्दात साहित्य संमेलनाध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी साहित्य महामंडळ पदाधिकाऱ्यांचे कान पिळले.

वर्धा येथे रविवारी (दि. 3) 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समाराेपीय अध्यक्षीय भाषणात ते बाेलत हाेते.

..तर ते साहित्य काय कामाचे?

चपळगावकर म्हणाले की, उदारता, मन जणण्याची शक्ती जे साहित्य देत नाही ते काय कामाचे. मतभेत काहीही असले तरी एकमेकांचे विचार समजून घेतले पाहिजे. संमेलनातून माणसे एकमेकांचा जाेडली जातात. लेखक, वाचक यांच्यातील अडसर दूर करण्याचं ते एक माध्यम आहे. संमेलनात मनातील आवाज स्पष्ट उमटला जाताे. आवाज बुलंद हाेताे. दुसऱ्याच्या मताबद्दलची सहिष्णूता ही आपली परंपरा आहे. मत मांडण्याचा अधिकार आपल्या परंपरेने आपल्याला दिला आहे. हे लक्षात घेतले पाहिजे असेही चपळगावकर म्हणाले.

दु:ख काेण्या जातीचं, गावाचं नसतं

चपळगावकर म्हणाले, लेखकाने लाेकांच्या मनातील प्रश्न, समस्या, दु:ख हे आपल्या लेखनातून उमटवले पाहिजे. नव्या प्रतीभेचे हुंकार जेव्हा येतात तेव्हा त्याचं स्वागतच हाेतं. तेव्हा आपण काय लिहिताे हे लेखकानेही पाहिलं पाहिजे. दु:ख काेण्या जातीचं, गावाचं नसतं तर दु:ख हे दु:ख असतं हे लक्षात घ्यायला हवं.

विनाेबांना कधी अध्यक्ष नाही केले

चपळगावकर म्हणाले, विनाेबा भावेंनी जे लिहिलं, त्यांची शब्द सामर्थ्यता बघितली तर आपण ते आणि त्यांच्यासारख्या कित्येकांना अध्यक्षपदी बसवले नाही, याची खंत वाटते. आपण या गाेष्टींकडे अत्यंत रुढ परंपरेतून बघत आलाे आहोत.

सुरक्षेबद्दल नेत्यांनीही बघावे

चपळगावकर म्हणाले, संमेलनाच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली हाेती. त्यांच्या भाषणावेळी चपळगावकर येत असताना फडणवीस यांच्यासाठी असलेल्या सुरक्षा यंत्रणेने त्यांना आत येऊच दिले नाही. यामुळे थाेडा गदाराेळ झाला. हाच धागा धरत ते म्हणाले की, राजकीय नेत्यांनीही कार्यक्रमांना जाताना सुरक्षा यंत्रणेकडे जरा बघितले पाहिजे. पाेलिस बिचारे त्यांना सांगितलेले काम करत असतात. मात्र काही कारणाने वाद हाेतो. पण त्यातून काहीतरी मार्ग काढता आला पाहिजे.

मतभेदाच्या भिंती वितळू द्या

चपळगावकर म्हणाले, मुळातच माेकळेपणा कसा येईल असा विचार केला पाहिजे. असेही ते म्हणाले. एक उदारता गेल्या पिढीने बघितले आहे. आजच्या काळातही मध्ये आलेल्या भितींचं आपाेआप विसर्जन झालं पाहिजे. मतभेदाच्या विनाकारण झालेल्या भिंती वितळू द्या आणि नव्या पिढीला पाहू द्या.

म्हणून मी अध्यक्ष झालाे

चपळगावकर म्हणाले, मला यापूर्वीही अध्यक्षपदाबद्दल विचारणा झाली. मात्र, मी प्रत्येकवेळी नाही म्हणत गेलाे. निवडणूक तर मला नकाेच हाेती. पण यावेळी विचारणा झाल्यावर वाटलं की, सध्याचं वातावरण बघता हीच वेळ आहे आपल्या मनातील बाेलण्याची. म्हणून मग अध्यक्षपद स्विकारले. मी जे लिहिले ते सामान्यांच्या मनातील लिहिले असे त्यांना वाटल्याने लाेकांनीही मला प्रेम दिले.

बातम्या आणखी आहेत...