आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड जवळील राहुडबारी घाटात बिबट्या आणि चारचाकीत अपघात झाला. बिबट्याचेच नव्हे तर चालकाचेही नशीब बलवत्तर असल्याने या जीवघेण्या अपघातातुन आणि बिबट्याच्या संभाव्य हल्ल्यातून दोघेही बचावले. हा अपघात सोमवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडला.
सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल
बचावलेल्या बिबट्याने पुन्हा जंगलात धूम ठोकली.या अपघाताचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायलर झाल्यानंतर सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. वन्यजीवांच्या अधिवासात मानवाने घुसखोरी केल्याने वन्यजीव हे आता नागरी वसाहतीमध्ये सतत दिसुन येत आहे. तसेच बिबट्यांची संख्याही वाढत असल्याने शहरामध्ये किंवा वाडी वस्तीवर सतत बिबट्यांचे दर्शन होत आहे.
असा अडकला बिबट्या
मुंबई आग्रा महामार्गावर सोमवारी दुपारी राहुडबारी घाटात एक बिबट्या रस्ता ओलांडत होता. मात्र यावेळी तो एका चारचाकीच्या समोर आल्याने अपघात झाला. परंतू चारचाकी चालकाने तात्काळ गाडी थांबविली. मात्र गाडीच्या पुढील भागात बिबट्या अडकला गेल्याने तो जखमी झाला होता, परंतू जीव वाचविण्यासाठी बिबट्याची धडपड सुरु होती. यावेळी वाहनचालकाने प्रसंग ओळखून गाडीखाली न उतरताच गाडी हळुहळु पाठीमागे घेतली.
बिबट्याची जंगलात धाव
जखमी बिबट्याही आपला जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होता. गाडी पुन्हा मागे घेण्यात आल्यानंतर बिबट्याने गाडीपासुन मुक्त होताच क्षणाचाही विलंब न लावता थेट जंगलात धुम ठोकली. ऐरवी बिबट्या पाहिल्यानंतर चांगल्या चांगल्याची दाणादाण उडते, तोच बिबट्या आज आपला जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असतांनाचे नागरिकांना व्हिडीओद्वारे पहाण्यास मिळाले.
ज्याने चित्रीकरण केले तो इसमही पुढील प्रवासाला निघुन गेला अन ज्या चारचाकीचा अपघात झाला होता, तो वाहनचालकही निघुन गेला. व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या रस्त्यावर ठिकठिकाणी जाऊन बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.