आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेवला येथील कै.सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन पंकज पारख यांना दि. 10 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश निफाड विशेष न्यायालयाने दिले. शुक्रवार दि. 3 रोजी पारख यांना निफाड न्यायालयात हजर करण्यात आले होते. संशयित पारख यांना गुरुवारी नाशिक मधून अटक करण्यात आली होती. ग्रामीण पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात एका निवासी प्रकल्प असलेल्या फ्लॅटमध्ये ही कारवाई केली होती.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पतसंस्थेचे संस्थापक पंकज पारख, चेअरमन योगेश सोनी, व्यावस्थापक अजय जैन, आणि संचालक मंडळाच्या विरोधात सहायक निबंधक प्रताप पाडवी यांच्या तक्रारीनुसार 21 कोटी 96 लाख 99 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखे कडून सुरु आहे. संशयित पंकज पारख हे शहरात असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली पथकाने संशयित पारख यांचा माग काढत त्यांना अटक केली.
या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने संशयित पारख यांच्यासह इतर संचालकांची चौकशी करणे गरजेचे असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने सरकारपक्षाचा युक्तीवाद एकून घेत दि. 10 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरिक्षक अशोक मेश्राम अधिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याता तपास करत आहे.
काय आहे अपहार
संशयित पंकज पारख यांनी कै. सुभाषचंद्र पारख नावाने पतसंस्थता स्थापन केली आहे. सहायक निबंधक यांनी पंतसंस्थेच्या ताळेबंदचा आढावा घेतला लेखापरिक्षण मध्ये पतसंस्था तोट्यात असल्याचे निदर्शनास आले होते. पतसंस्थेच्या ठेवी पतसंस्थेत जमा न करता 90 ते 100 कर्जदारांना मुदत पावती नसतांना तसेच कर्जाची मागणी अर्ज नसतांना मुदत पावतीवर कर्ज वाटप केल्याचे लेखापरिक्षणात समोर आले. अनियमित कर्ज वाटप केल्यानंतर वसूली केली नाही. सोने तारण न ठेवता कागदोपत्री कर्ज दिल्याचे समोर आले. सभेचे इतीवृत गहाळ करण्यात आले होते. ठेवीदारांनी मोर्चा काढला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.