आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाठेगल्ली परिसरातील धवलगिरी साेसायटी व शंकर नगर परिसरात इमारतीच्या पार्किंग व रस्त्यावर उभ्या असलेल्या चार चारचाकी वाहनांची बुधवारी मध्यरात्री टवाळखाेरांकडून ताेडफाेड करत काचा फाेडण्यात आल्या. या घटनेनंतर तातडीने भद्रकाली पाेलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे तपासचक्रे फिरवत प्रकरणी तीन संशयितांना तपाेवनातून ताब्यात घेतले.
गेल्याच आठवड्यात सातपूर परिसरात चारचाकी वाहने फाेडण्याचे प्रकरण ताजे असतांनाच बुधवारी मध्यरात्री काठेगल्ली परिसरातील टवाळखाेरांनी चारचाकी गाड्या फाेडल्याने एकच खळबळ निर्माण झाली. रवींद्र शाळेजवळील बरखाबहार साेसायटीमध्ये राहत असलेले साैरभ मराठे यांचे चारचाकी वाहन ( एम एच 04 जीयु 8324 ), रवींद्र शाळेसमाेर लावण्यात आलेली मुर्तंजा अत्तरवाला यांची (एचमएच 48 पी 0716,) धवलगिरी साेसायटी परिसरातील सीमा पेठकर यांच्या घरासमाेरील चारचाकी (एमएच 15 जीएस 5510) व शंकर नगर परिसरातील सिद्धेश भडके यांची (एमएच 15 डीस 2805 ) हे चारचाकी वाहने टवाळखाेरांनी रात्री 2 वाजेच्या सुमारास दुचाकीवर ट्रिपल शीट येत थेट वाहनांच्या काचा फाेडत हैदास घातला.
याबाबत माहिती समजताच भद्रकाली पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक दत्ता पवार, पाेलिस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार आदींनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. परिसरातील दुकानामधील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला.दरम्यान या प्रकरणी संशयित नीलेश पवार, सुमीत पगारे,विकी जावरे या टवाळखाेरांच्या मुसळ्या आवळत तपाेवन परिसरातून अटक केली. नागरी वस्तीच्या भागात अशा प्रकारे गाड्याची ताेडताेड करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
पाेलिस गस्तीवरच निर्माण झाले प्रश्नचिन्ह
काठेगल्ली, शंकर नगर परिसरात गेल्या काही दिवसंापासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत या परिसरात दाेन शाळा व खासगी क्लासेस असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या टवाळखाेरांकडून अशा प्रकारे चारचाकी वाहने फाेडली जात असतांना पाेलिसांना यांची भणक देखील लागली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकारामुळे मात्र पाेलिस गस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुन्हेगारीवर कधी लागणार अंकूश
शहरातील सिडकाे, सातपूर, नाशिकराेडसह जुने नाशिक, द्वारका परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ हाेत आहे.या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहेे.पाेलिस आयुक्त अॅक्शन माेडवर येत या वाढत्या गुन्हेेगारीला कधी अंकूश लावतील असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.