आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात दुचाकी घुसली ATM मध्ये:सिडकोत नियंत्रण सुटल्याने अपघात, ताक आणायला गेलेल्या तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशकातील सिडको परिसरात सावतानगर येथील महालक्ष्मी चौक मंदिरासमोर एसबीआय बॅकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरूणीकडून ताबा सुटल्याने दुचाकी एटीेएममध्ये घुसली. यात तरुणीच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात तरुणीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

गौरी प्रदीप सैदाने (रा. खांडे मळा, सावता नगर) असे जखमी मुलीचे नाव असून सकाळी 9.30 च्या सुमारास घरातून ताक घेण्यासाठी आली असता पैसे काढण्यासाठी ती एटीएम जवळ आली. तिचा आपल्या गाडीवरचा ताबा सुटल्याने तिच्याकडून गाडी थेट समोरच असलेल्या एस.बी.आय च्या ATM मध्ये घुसली.

परिसरात एकच पळापळ

दुचाकीचा वेग जास्त असल्याने एटीएमचा काचेचा दरवाजा तुटून मशीनजवळ जाऊन आदळल्याने मोठ्याने आवाज झाला. त्यामुळे परिसरात एकच पळापळ झाली. हा प्रकार पाहताच घटनास्थळी गर्दी झाली. मुलीला दुखापत झाल्याने जमलेल्या नागरिकांनी पोलिसांना कळताच घटनास्थळी धाव घेतली.

बातम्या आणखी आहेत...