आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:नाशिक-निफाड रस्त्यावर कारचा भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार घुसली थेट किराणा दुकानात

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार चक्क किराणा दुकानात घुसली. त्यामुळे दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातावेळी दुकानात दोन जण होते. मात्र भरधाव कार येताच या दोघांनीही उडी मारुन दुकानातून पळ काढला, त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीतहानी या घटनेत झालेली नाही.

नाशिकच्या खेरवाड़ी-चांदोरी या रस्त्यावर हा अपघात झाला आहे. नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट कार क्र. MH 15, HM 0558 या कारमधील चालक राहुल भोर यांचा नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या विठ्ठल किराणा स्टोरमध्ये घुसली. वेगवान कार दुकानात घुसल्याने दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चालक फरार
या अपघातात किराणा दुकानदाराचे लाखोंचे नुकसान झाले आहे. दुकानात बसलेल्या मालकाला काही दुखापत झाली आहे. रुग्णालयात गेल्यानंतर दुकानचालकाला पट्टी केल्यानंतर त्याला सुट्टी देण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर कार चालक राहुल भोर कारसोडून घटनास्थळावरुन पसार झाला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक भोरने दारुचे सेवन केले होते. सध्या नाशिक पोलिसांनी कारला जप्त केले असून, आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. ही घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...