आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक:ऑक्सिजन गळतीचे कारण अखेर उघड, रुग्णालयाच्या टाकीत ऑक्सिजन भरताना ‘प्रेशर कंट्राेल’ न ‌झाल्याने दुर्घटना

नाशिक / भूषण महाले15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोराेनाशी झुंज देणाऱ्या २४ रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डाॅ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळती नेमकी कशी घडली याचा उलगडा घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे झाला आहे. ‘दिव्य मराठी’च्या हाती लागलेल्या या एक्सक्लुझिव्ह फुटेजमध्ये दिसते आहे की, टँकरमधून ऑक्सिजन रुग्णालयाच्या टाकीत भरण्याची प्रक्रिया सुरू करताच दाब वाढला आणि ‘प्रेशर कंट्राेल’ न झाल्याने एकाएकी टाकीच्या पाइपमधून मोठी गळती सुरू झाली.

गळती सुरू हाेताच क्षणार्धात द्रवरूप ऑक्सिजनचे बर्फाच्छादित लोटच्या लोट घटनास्थळी उठू लागले आणि उपस्थितांना जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला. या ठिकाणी टायो निप्पोन या ठेकेदार कंपनीचे तंत्रज्ञ उपस्थित नसल्यामुळे वेळीच गळतीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही आणि अनर्थ घडला. िवशेष म्हणजे, घटनेला २४ तासांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतर देखील कंपनीचे तंत्रज्ञ या ठिकाणी फिरकले नसल्याची धक्कादायक माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पालिकेच्या वतीने अधिकृतरित्या काेणतीही फिर्याद नाेंदविण्यात आली नव्हती. मात्र, पाेलिसांनी याप्रकरणी स्वत:हून फिर्याद देत अज्ञात व्यक्तीविराेधात सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात टायाे निप्पाेन या ठेकेदार कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष महापालिका व पाेलिसांनी काढला आहे. टँकरमध्ये आॅक्सिजन भरतानाच ‘प्रेशर कंट्राेल’ न झाल्यामुळे गळती झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी काढला आहे. कारण देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराची असून काही प्रसंग आेढवल्यास वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञांची टीमही घटनास्थळी ठेवली गेली नसल्याचे समाेर आले आहे. घटनेच्या चाेवीस तासांनंतरही संबंधित ठेकेदार कंपनीची टीम शहरात पाेहाेचली नसून ती शुक्रवारी येणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भद्रकाली पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक साजन साेनवणे यांनी ‘सुमाेटाे’ फिर्याद देताना, टँकर भरताना संबंधित दुर्घटना झाल्याचे नमूद करत अनाेळखी व्यक्तीविराेधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पालिकेकडून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अधिकृतपणे काेणतीही फिर्याद दिली गेली नव्हती.

दुर्घटनेच्या १२ तासांनंतर रुग्णालय पुन्हा फुल्ल
घटनेला १२ तास उलटत नाही तोच रुग्णालयात बुधवारी रात्री उशिरापर्यंत दाखल होण्यासाठी रुग्णांची गर्दी झाली. गुरुवारी सकाळी दहा वाजता तर अकरावर रुग्ण वेटिंगवर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर स्ट्रेचर, व्हीलचेअर व खाली चटई टाकून अॉक्सिजन घेत होते.

...आता हे मुद्दे कळीचे
- टाकीला अगाेदरपासून सूक्ष्म गळती हाेती का?
- असल्यास त्याची वेळीच दखल का घेतली नाही?
- आॅक्सिजन भरतेवेळी प्रेशर कंट्राेल का झाले नाही?

देखभाल-दुरुस्ती करणारे तंत्रज्ञच नव्हते; चाेवीस तासांनंतरही पत्ता नाही
आॅक्सिजनची टाकी भरली जाते तेव्हा तेथे ठेकेदाराचे तंत्रज्ञ असणे आवश्यक हाेते. मात्र, घटना घडली तेव्हा देखभाल-दुरुस्ती करणारे तंत्रज्ञ नसल्याचे निदर्शनास आले आहे. हे तंत्रज्ञ जागेवर असते तर तत्काळ पुरवठा सुरळीत करून रुग्णांचे प्राण वाचवता आले असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

फुटेज प्राप्त; शहानिशा करून सांगताे
ही दुर्घटना कशी झाली, जबाबदार काेण याची चाैकशी उच्चस्तरीय समिती करेल. आॅक्सिजन टँकजवळील फुटेज प्राप्त झाले असून सकृतदर्शनी टँकरमधून आॅक्सिजन भरताना गळती झाल्याचे दिसते. मात्र, व्यवस्थित फुटेज बघून त्याची शहानिशा करावी लागेल.- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

फार्मासिस्टचा जबाब : लिकेज होत असल्याची तक्रार करण्यापूर्वीच घडली भयंकर दुर्घटना
घटना घडण्यापूर्वी काही मिनिटे आधी ऑक्सिजन टँक लीक असल्याचे लक्षात आल्यानंतर लिकेजचे फोटो काढून संबंधित कंपनीच्या इंजिनिअरला पाठवले. मात्र, फोटो स्पष्ट नसल्याने व्हिडिओ काढण्यास सांगण्यात आले. तेवढ्या वेळात टाकीत आॅक्सिजन भरण्यास सुरुवात झाली अन‌् पाइप फाटून गळती हाेऊ लागल्याचा जबाब रुग्णालयाच्या फार्मासिस्टने समितीला दिला.

बातम्या आणखी आहेत...