आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक ठक्कर बाजार बसस्थानक समोरील चौफुलीवर भरधाव ट्रीपलसीट जाणाऱ्या दुचाकीने बसला धडक दिल्याने अपघात झाला. त्यात दोन तरुण ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोेलिसांनी दिलेली माहिती अाणि सुनील जंगम (रा. बुधवार पेठ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शुभम काेकाटे(२१, रा. खुटवडनगर), शुभम सोनवणे (रा. जळगाव) अाणि जयेश महाजन हे तिघे सिव्हिल हाॅस्पिटलकडून दुचाकीवरून ठक्कर बाजार येथे जेवणासाठी जात असताना त्र्यंबकनाका सिग्नलकडून येणाऱ्या बसला धडक दिली.
यात शुभम कोकाटे, शुभम सोनवणे, जयेश महाजन गंभीर जखमी झाले. तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता काेकाटे व साेनवणे यांना डाॅक्टरांनी मृत घाेषित केले तर जयेश महाजनची प्रकृती गंभीर आहे. कोकाटेच्या पश्चात अाई, वडील, बहीण, अाजी आहेत. ते दाेघेही एकुलते एक होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.