आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:तीन वाहनांच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, 10 पेक्षा अधिक प्रवाशी जखमी, सटाणा- देवळा महामार्गावरील घटना

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये तीन वाहनांच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सटाणा देवळा महामार्गावर रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. यात १० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

बस, पिकअप आणि ट्रॅक्टर या तीन वाहने एकमेकांवर आदळले. यात ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला असून बसमधील प्रवाशांसह ट्रॅक्टरमधील १० पेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत.

नक्की काय घडले?

नाशिकच्या सटाणा-देवळा महामार्गावर रात्रीच्या सुमारास सावकी फाटा याठिकाणी बस, ट्रॅक्टर व पीकअप यांचा तिहेरी अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला.

नाशिकहून नंदुरबारकडे भरधाव जाणाऱ्या बसची ट्रॅक्टरला जोरात धडक बसली. दरम्यान ट्रॅक्टर पुढे जाणाऱ्या पिकअपर धडकला. जखमी प्रवाशांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात येत आहे.