आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसच्या धडकेत आई- वडिलांसह चिमुकली ठार:नाशिकमधील वणी-सापुतारा महामार्गावर भीषण अपघात, बसमधील 5 प्रवाशी जखमी

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्यातील वणी- सापुतारा महामार्गावर खोरी फाट्याच्या जवळ राज्य परिवहन महामडळाच्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती, पत्नी व त्यांच्या 4 महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमधील पाच प्रवाशी जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी घडली.

विशाल नंदू शेवरे (24), सायली विशाल शेवरे (20) व अमृता विशाल शेवरे अशी मृतांची नावे आहेत. सुरगाण्याकडून नाशिककडे ही बस जात होती. बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरात धडकली. या धडकेत दुचाकी उडून रस्त्यालगतच्या कांद्याच्या शेतात पडली तर बस झाडाला जाऊन आदळली. यामध्ये बसमधील पाच प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्याचे कळताच आजूबाजूच्या लोकांनी मदतकार्य सुरू केले. मात्र, धडक जोरात असल्याने दुचाकीवरील आई-वडिल मुलीसह जागीच ठार झाले. अपघाताची माहिती कळताच वणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.वणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

बसमधील जखमींची नावे
मंजुळा एकनाथ वाघमारे, देवीदास तुळशीराम भोये, तारा रमेश कुंभार, रमेशनाया कुंभार, कृष्णा त्र्यंबक गावंडे अशी आहेत.

बातम्या आणखी आहेत...