आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक-बेळगाव विमानसेवेला सुरुवात:नाशिकचे विमानतळ तीन फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टार एअरने नाशिक-बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा ३ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू केले आहे. जवळपास ५० आसनी विमानाद्वारे नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उडान योजनेअंतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निर्देशानुसार स्टार एअरने विमानसेवेसाठी बुकिंग पुन्हा सुरू केल्याची माहिती उद्योजक मनीष रावल यांनी दिली. विशेष म्हणजे बंद झालेली विमानसेवा सुरू करण्यासाठी भुजबळांच्या पाठपुराव्याला यश येत असताना केंद्र अन‌् राज्यात सत्तेत असतानाही स्थानिक लाेकप्रतिनिधींचा केवळ पाठपुरावाच सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे नाशिक विमानतळावरून उडान योजनेला पुन्हा मुदतवाढ देऊन विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून ३ फेब्रुवारी २०२२ पासून पुन्हा उड्डण सुरू होत आहे. असे असेल विमानसेवेचे नियमित वेळापत्रक वेळापत्रकानुसार बेळगावहून शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता उड्डाण भरेल ते नाशिक येथे १०.३० वाजता पोहोचेल. रविवारी सायंकाळी ५.०५ वाजता उड्डाण भरेल व सायंकाळी ६.०५ वाजता नाशिकला पोहोचेल. नाशिकहून शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजता निघेल ११.४५ ला बेळगाव येथे पोहोचेल. रविवारी सायं. ६.३० वाजता उड्डाण करून सायं. ७.३० वा. बेळगावला पोहोचेल.

बातम्या आणखी आहेत...