आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रनवेच्या देखभाल दुरुस्तीचे काम:उड्डाणासाठी पुढील 13 दिवस नाशिक विमानतळ राहणार बंद

नाशिक7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक विमानतळ २० नाेव्हेंबरपासून ४ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे. विमानतळाच्या रनवेचे एचएएलकडून नियमित केली जाणारी वार्षिक देखभाल दुरुस्तीची कामे या काळात हाेत आहे. यामुळे प्रवासी किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या विमानांसाठी लँडिंग, टेकआॅफ येथून हाेणार नाही. यामुळे आता नाशिक ४ डिसेंबरपर्यंत खऱ्या अर्थाने विमानसेवेने पूर्णत: डिस्कनेक्ट हाेणार आहे.

अलायन्स एअर, स्टार एअरने सेवा अचानक बंद केल्याने ते देत असलेल्या अहमदाबाद, पुणे, बेळगाव, दिल्ली या शहरांकरिताच्या विमानसेवा बंद झाल्या. यामुळे संतप्त भावना नाशिककरांमध्ये पहायला मिळत आहे. स्पाइस जेट या कंपनीकडून मात्र नाशिक-दिल्ली, हैदराबाद-नाशिक विमानसेवा नियमित सुरू आहे. ती सेवादेखील या १३ दिवसांसाठी आता बंद ठेवली गेली आहे. हीच सेवा याकाळात शिर्डी विमानतळावर वळविली जाते का याकडे नाशिककरांचे लक्ष लागून हाेते मात्र, तेथे सायंकाळी दृश्यमानतेची समस्या बिकट असल्याने इतरत्र विमानांचे लँडिंग करावे लागत असल्याचे अनेकदा घडले असल्याने तेथून ही सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

उद्याेजक, पर्यटकांची होणार गैरसाेय
नाशिक विमानतळ विमान उड्डाणासाठी बंद राहणार असल्याने उद्याेजक व पर्यटकांची गैरसाेय हाेणार आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड प्रशासनाने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार येथे हा २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत विमानतळाच्या धावपट्टीच्या रिसर्फेसिंगचे काम केले जाणार आहे. परिणामी या धावपट्टीवरून विमाने ये-जा करू शकणार नाहीत. यामुळे नाशिकमधून इतर राज्यांत कामानिमित्त जाणाऱ्या उद्याेजकांची तसेच येथे येणाऱ्यांची गैरसाेय हाेणार आहे. त्यांना आता इतर पर्यायांचा वापर करावा लागणार आहे. मात्र, ४ डिसेंबरनंतर ही सेवा पूर्ववत हाेईल

हवाई वाहतूक संचालनालयाच्या निर्देशानुसार दुरुस्ती
हवाई वाहतूक संचालनालयाच्या निर्देशानुसार आेझर येथील या विमानतळाच्या धावपट्टीची देखभाल, दुरुस्ती व मजबुतीचे काम केले जाते. दुरुस्ती सुरू असल्याच्या या काळात नागरी किंवा संरक्षण विभाग असे काेणत्याही प्रकारचे विमान धावपट्टीवर उतरू शकत नाही किंवा उड्डाणही घेऊ शकत नाही. यामुळे १३ दिवस हे विमानतळ उड्डाणासाठी बंद राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...