आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक विमानतळ वर्षभर राहणार कार्यरत:विमानतळाची सुरक्षा वाढविण्यासाठी डिजिटल सिस्टीमसह सीसीटीव्ही बदलणार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एचएएलकडून चालविले जात असलेले नाशिक विमानतळ वर्षातील सर्व दिवस सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत कार्यरत रहाणार आहे. विमानतळावर भविष्यात प्रवासी विमानसेवेच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी ऑपरेशनल क्षमता वाढविण्यासाठी नवीन समांतर धावपट्टी उभारण्याचे नियाेजन असून अतिरिक्त टॅक्सी वे लिंकसह विमान पार्किंगसाठीच्या सध्याच्या सुविधांचा देखिल विस्तार हाेणार आहे.

विमानतळाची सुरक्षा वाढवण्यासाठी टर्मिनल बिल्डिंग, एटीसी, रनवे आणि पार्किंग यांसह एरोड्रोम परिसरात सर्व सीसीटीव्ही कॅमेरे अत्याधुनिक तंत्रज्ञान डिजिटल सिस्टीमसह बदलण्यात येणार असल्याचे एचएएल प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नियमित देखभाल व दरूस्तीकरीता नुकतेच विमानतळ सर्व उड्डाणांसाठी बंद ठेवण्यात आलेले हाेते. 4 डिसेंबरपासून ते पुन्हा एकदा उड्डाण संचलनासाठी उघडण्यात आले आहे. धावपट्टीच्या देखभाल दुरूस्तीमध्ये मायक्रो सरफेसिंगच्या नवीनतम कोल्ड इमल्शन तंत्रज्ञानाचा समावेश होता. हायड्रोप्लॅनिंग समस्या दूर करण्यासाठी आणि सुरक्षित उड्डाण ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी धावपट्टीचा पृष्ठभाग पुनर्संचयित करण्यासाठी धावपट्टीची संपूर्ण लांबी. तीच्या क्षमतेचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले. सध्याच्या धावपट्टीवर आता काेणत्याही प्रकारची विमाने उतरू शकतील इतकी क्षमता आहे.

बीपीसीएलचे इंधन स्टेशन

इंधन भरणारी एजन्सी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड एचएएल परिसरात अगाेदरपासूनच कार्यरत आहे. या कंपनीने देखील नागरी उड्डाणाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी विमानतळ परिसरात आपले इंधन भरण्याचे स्टेशन स्थापन केले आहे.

कमी दृश्य मानतेतही लॅण्डींग शक्य

भविष्यातील विमानतळ विकास योजनांमध्ये कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत ऑपरेशनल सहाय्यासाठी अत्याधुनिक रनवे व्हिज्युअल रेंज मापन उपकरणांची स्थापना आणि डॉप्लर व्हीएचएफ ओम्नी रेंज आदी तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे कमी दृश्यमानतेतही विमानांचे लॅण्डींग येथे सहज शक्य हाेणार आहे.

एचएएल ने विमान कंपन्यांना नाशिककडे आकर्षित करण्यासाठी एअरोनॉटिकल तसेच नॉन-एरोनॉटिकल शुल्कात भरीव सवलत आणि ऑपरेशनच्या सुरुवातीच्या काळात मोफत नाइट पार्किंग ची ऑफर दिली आहे. ओझर विमानतळावर काम केल्याने, विमानतळावरील प्रगत क्षमतांचा वापर करून आणि खात्रीशीर प्रवासी संख्येचा सर्व विमान कंपन्यांना फायदा होईल. तसेच विमानकंपन्या या विमानतळाचा वापर नाइट लॅण्डींग साठी आणि वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी देखिल करू शकतात असे एचएएलने स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...