आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकमध्ये 9 ते 11 डिसेंबर दरम्यान अंकुर फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन अभिव्यक्ती मिडीया फॉर डेव्हलपमेंटकडून करण्यात येत आहे. स्मारक, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड येथे रोज सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत फेस्टिव्हल असणार आहे.
फेस्टिव्हल सर्वांसाठी खुले
हा फेस्टिव्हल सर्वांसाठी खुले असून यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. फेस्टिव्हलचे औपचारिक उद्घाटन प्रसिद्ध माहितीपट निर्मात्या शबानी हसनवालिया, थर्ड आय, नवी दिल्ली यांच्या रात या माहितीपटाने होणार आहे. तर फेस्टीव्हलचा समारोप 11 डिसेंबरला हंसा थपलियाल माहितीपट निर्मात्या, बेंगळूरू यांच्या द आउटसाइड इन या माहितीपटाच्या सादरीकरणाने होणार आहे. फेस्टिव्हलमध्ये 50 हून अधिक चित्रपट, माहितीपट, या कलाकृतीचे सादरीकरण होणार असून वेगवेगळ्या विषयावर कार्यशाळा होणार आहेत.
या फेस्टिवलमध्ये नवोदित कलाकारांना, वंचित समूहांतील घटकांना आपले जगणे मांडण्यासाठी असलेले व्यासपीठ म्हणजे अंकुर फिल्म फेस्टिव्हल असतो. यामध्ये फक्त फिल्म्सचे सादरीकरणच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांकडून शिकून आपली अभिव्यक्ति आणखी समृद्ध करण्यासाठीची संधी म्हणजे अंकुर फिल्म फेस्टिव्हल असतो. यात कुठलीही स्पर्धा नाही, पारितोषिक नाही, अंतिम कलाकृतीपेक्षा कलाकृतीपर्यंत पोहचण्याच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याच्या उद्देशाने अंकुर फिल्म फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येते. तरी नाशिककरांनी आवर्जून अंकुर फेस्टीव्हलमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अभिव्यक्तीकडून करण्यात आले आहे.
अशी आहेत नियोजन
9 डिसेंबर - शबानी हसनवालिया थर्ड आय, नवी दिल्ली.
माहितीपट - रात, वेळ: सायं.6.30 ते 8.30 वाजता
10 डिसेंबर, देबस्मिता आणि अंशुमन एजेंट्स ऑफ इश्क, मुंबई.
विषय : लिंगभाव, संमती आणि लैंगिकता
वेळ सकाळी. 10.00 ते दुपारी. 1.00 वाजता
10 डिसेंबर, बिशाखा दत्ता, पॉईंट ऑफ व्ह्यू, मुंबई,
फिल्म ताजा खबर हॉट ऑफ द प्रेस - डिजिटल स्टोरीज
वेळ सायं - 6.30 ते 8.30 वाजता.
11 डिसेंबर, पौर्णिमा आगरकर,INECC पुणे
विषय : हवामान बदल आणि कृतीशील प्रतिसाद
वेळ सकाळी. 10.00 ते दुपारी. 1.00 वाजता.
11 डिसेंबर , हंसा थपलियाल, माहितीपट निर्मात्या, बेंगळूरू.
माहितीपट, द आउटसाइड इन
वेळ: सायं. 6.30 ते 8.30 वाजता
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.