आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेडरेशन कपमध्ये नाशिकच्या अ‍ॅथेलिटीक्सची सुवर्णधाव:नाशिकच्या गुगनसिंगने 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक ​​​​​​, जायाेतीला कांस्य

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅथेलिटीक्स स्पर्धा आणि नाशिकचे विजयी खेळाडू हे आता समीकरणच बनले आहे. नुकतेच गुजरात येथे पार पडलेल्या फेडरेशन कपमध्ये नाशिकच्या गुगनसिंगने 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तर याच प्रकारात जायाेतीने कांस्यपदकावर आपले नाव काेरले. या खेळांडूच्या कामगिरीमुळे पुन्हा एकदा नाशिकचे नाव उंचावले गेले आहे.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अ‍ॅथेलिटीक्स स्पर्धा असाे नाशिकच्या अ‍ॅथेलिटीक्स खेळांडूनी आपला विजयी दबदबा कायम ठेवला आहे. हीच पंरपरा कामय ठेवत गुजरातच्या नादीड येथे रंगलेल्या फेडरेशन कप स्पर्धेत नाशिकच्या एकलव्य इन्सिट्यूटच्या गुननसिंगने यशस्वी कामगिरी करत सुर्वणपदक प्राप्त केले. याच बराेबर जायाेतीने देखील कांस्य पदकावर नाव कोरले.

मानाचा तुरा खोवला

या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीमुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खाेवला गेला आहे. या खेळांडूना प्रशिक्षक विजेंद्ररसिंग यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळांडूचे नागरिकांसह खेळाडूकडून अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...