आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या ठाकरे रुग्णालयात होणार उपचार:नाशिकमध्ये आजपासून बाह्य रुग्ण तपासणी सुरू; बिटको रुग्णालय ओस पडण्याची शक्यता

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक रोड येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मंगळवारी दुपारपासून बाह्य रुग्ण तपासणीला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे जुने बिटको रुग्णालय आता ओस पडण्याची चिन्हे आहेत. आयुक्त रमेश पवार यांनी सकाळी दहा वाजता रुग्णालयाची पाहणी करून स्वच्छतेवर भर देण्यास प्राधान्य दिले. यासाठी हौसिंगद्वारे स्वच्छता कर्मचारी नेमण्याचे ही आदेश दिले. दोन आठवड्यात नवीन रुग्णालय शस्त्रक्रिया गृह सुरू होणार असून, त्यासाठी जलद गतीने प्रक्रिया सुरू आहे.

आयुक्तांकडून पाहणी

अनेक वर्षापासून रुग्णांच्या प्रतीक्षेत असलेली महापालिकेची नवीन रुग्णालयाच्या इमारतीत अखेर बाह्य रुग्ण तपासणीला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी कोविड सेंटरसाठी वापर करण्यात आला होता. आयुक्त रमेश पवार यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर रुग्णालय तातडीने सुरुवात करण्याल प्राधान्य दिले होते. त्यासाठी त्यांनी वारंवार येऊन पाहणीही केली. मंगळवारी सकाळी त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी करत वैद्यकीय अधीक्षक नागरगोजे यांना काही बदल करण्याच्या सूचनाही दिल्या.

यावेळी महापालिका आयुक्त रमेश पवार, वैद्यकीय अधीक्षक बापूसाहेब नागरगोजे, डॉ जितेंद्र धनेश्वर, डॉ आवेश पलोड,डॉ. कल्पना कुटे, डॉ नलिनी शार्दूल, नीलेश साळी, संजय कुलकर्णी, आशा मुठाल, एलिझाबेथ त्रिभुवन, सुनील शिंपी यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते.

नवीन रुग्णालयाला चालना

महापालिकेची नवीन रुग्णालयात आता रुग्ण आणि नातलग यांच्या मुळे इमारतच्या आवारात रेलचेल वाढणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून बंद असलेल्या रुग्णालयाला चालना मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...