आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकील संघ निवडणूक:नाशिक वकील संघ निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात; उद्या मतदान

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक वकील असोसिएशनच्या शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, ही निवडणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप काही वकिलांनी केला आहे. त्यांनी निवडणूक समितीला आव्हान देत दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यावर गुरुवारी (दि. ५) अंतिम युक्तिवाद होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वकील संघाच्या १३ पदांसाठी ६ मे रोजी मतदान होणार आहे. तर ७ मे रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर होईल. यंदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष, सचिव, खजिनदार व सदस्य हे पुन्हा नशीब अजमावत आहेत. यात सदस्यांनी थेट सचिव, खजिनदारपदासाठी उमेदवारी केल्याने निवडणूक चुरशीची ठरत आहे.

दरम्यान, ही निवडणूक बेकायदेशीर असल्याचा अर्ज अ‍ॅड. वंदना पाटील यांनी न्यायालयात दाखल केला आहे. तर अ‍ॅड. अरुण माळोदे, अ‍ॅड. लीलाधर जाधव, किशोर सोनवणे, इम्तियाज शेख यांनी सोमवारी (दि. २) नवीन दावा न्यायालयात दाखल केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश देसाई यांच्यासमोर अंतरिम मनाईहुकूम अर्जावर सुनावणी झाली. न्यायाधीश यांनी दोन्ही बाजंूचा युक्तिवाद ऐकला. या दाव्यावर ५ मे रोजी सुनावणी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...