आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक भाजपा शहराध्यक्ष निवडीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या निरीक्षक माधवी नाईक यांनी पक्ष कार्यालयात सलग दुसऱ्या दिवशीही काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, याचवेळी पक्षाच्या एका ज्येष्ठ माजी पदाधिकाऱ्याला ही चर्चा समजताच त्यानी पक्ष कार्यालयात धाव घेत निरीक्षकांनाच जाब विचारला.
मोजक्याच पदाधिकााऱ्यांना कसे बेालावले? आम्ही इतके वर्ष पक्षात एकनिष्ठ राहून काम करतोय, अशा शब्दात विचारणा केल्याने निरीक्षकही बुचकळ्यात पडले. मात्र, वेळीच ज्येष्ठ नेत्याने मध्यस्थी करीत वादावर पडदा पाडला.
याचवेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठीही इच्छुक पदाधिकारी व तालुकाप्रमुखांशी त्यांनी चर्चा केली. भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे यांचा कार्यकाळ पुर्ण हेाऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. नवीन शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष नियुक्तीसाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू असतानाच बुधवारी (दि. १०)अचानक पक्षाच्या निरीक्षक अॅड. माधवी नाईक यांनी नाशकात पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शहराध्यक्षपदी व्यक्ती कसा असावा? असा प्रश्न उपस्थित करीत इच्छुकांशीही नाईक यांनी संवाद साधला.
ग्रामीणला आता तीन जिल्हाध्यक्ष मिळणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व लोकसभानिवडणूका लक्षात घेता नाशिक जिल्हाध्यक्षपद लाेकसभा मतदारसंघनिहाय विभागणी करण्याचे निश्चीत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यात, उत्तर नाशिक आणि दक्षिण नाशिक आणि मालेगाव स्वतंत्र अशी विभागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कोणत्या तालुक्यात कोण इच्छूक?
यामध्ये उत्तर नाशिकमध्ये कळवण, सटाणा, येवला, चांदवड, निफाड, नांदगाव यांचा तर दक्षिण नाशिकमध्ये सिन्नर, दिंडोरी, पेठ, सुरणा, त्र्यंबक, इगतपुरी तालुक्यांचा समावेश करण्यात येणार अाहे. मालेगाव जिल्हा स्वतंत्र आहे. यात, विद्यमान जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्यासह सरचिटणीस प्रा. सुनील बच्छाव, कैलास सोनवणे, भूषण कासलीवाल, सतीश मोरे, शंकर वाघ इच्छुक अाहेत.
तर दक्षीण जिल्हाध्यक्षपदासाठी अजय दराडे, नितीन गायकर, पांडुरंग बऱ्हे, भाऊसाहेब कडभाने यांचा समावेश आहे. इच्छुकांशी मुलाखतींचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सादर केला जाणार असून या महिन्या अखेरीस नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.
नक्की प्रकरण काय?
विजय साने, लक्ष्मण सावजी यांच्यासह विद्यमान शहराध्यक्ष गिरीश पालवे, सरचिटणीस प्रशांत जाधव, सुनील केदार, गणेश गिते, अनिल भालेराव, हिमगाैरी अाडके, दिनकर पाटील यांच्याशी चर्चा केली. दुसऱ्या दिवशी गुरूवारी (दि. ११) पुन्हा नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनिमित्त नाईक यांनी निवडक नेत्यांशी चर्चा केली. याचवेळी काही इच्छुकांनीदेखील हजेरी लावली. ही माहिती इतर पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनीही कार्यालयात धाव घेतली. माेजकेच पदाधिकारी बघून या पदाधिकाऱ्याला राग अनावर हाेऊन त्याने जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत नाईक यांनाच जाब विचारला.
गेल्या २० वर्षांपासून पक्षात सक्रिय असताना अाम्हाला बैठकीलाही बाेलावले नाही की अामचा विचारही केला जात नसल्याचे खडे बोल सुनावले. याचवेळी इतर पदाधिकाऱ्यानी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत वाद मिटविला. हा प्रकार बघून नाईक यांनीदेखील शहराची चर्चा बंद करून आटोपते घेतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.