आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक भाजपत शहराध्यक्ष हटाव माेहीम:बावनकुळे, महाजन करणार चाचपणी; संघटनेवर नियंत्रण धोक्यात

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिंदे गटाचे वाढते वर्चस्व राेखण्याची रणनिती - Divya Marathi
शिंदे गटाचे वाढते वर्चस्व राेखण्याची रणनिती

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील 11 ज्येष्ठ व माजी नगरसेवकांनी भाजपासारखा सक्षम पर्याय साेडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. किंबहुना याच लाटेत भाजपाचे उपाध्यक्ष व प्रवक्ते प्रताप मेहराेलीया यांनीही संघटनेला रामराम केल्याची बाब पक्षश्रेष्ठींनी गांर्भीयाने घेतली आहे.

भाजप सत्तेत आल्यानंतरही माेठे इनकमिंग तर झाले नाहीच, मात्र दाेन महिन्यात भाजपलाच शिंदे गटाकडून गळती लावण्याचे प्रकार सुरू झाल्यामुळे शहराध्यक्ष गिरीष पालवे हटाव माेहीमेला वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार व रविवार या दाेन दिवसासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे व संपर्कमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत चाचपणी हाेणार असल्याचे समजते.

जून महिन्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर इनकमिंग तर साेडा मात्र आऊटगाेईंग सुरू झाले आहे. माजी नगरसेविका पुनम धनगर यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे धक्का बसला हाेता. आक्रमक चेहरा असलेला भाजयुमाेचा अध्यक्ष विक्रम नागरे व माजी नगरसेविका इंदुमती नागरे यांनी शिंदे गटावर टकटक केली.

ऐनवेळी महाजन यांनी मुंबईतून सूत्रे हलवून संभाव्य प्रवेश साेहळा थांबल्यामुळे भाजपची माेठी नाचक्की टळली. मात्र गेल्या आठवड्यात नाशकात ठाकरे गटात ऐतहासिक बंड झाले. विशेष म्हणजे, या बंडात सहभागी झालेल्या 11 माजी नगरसेवकांचा प्राधान्यक्रम भाजप असताना ते शिंदे गटात गेले. एवढेच नव्हे तर, शहर कार्यकारणीतील अनुभवी पदाधिकारी अशी ओळख असलेले मेहराेलीया हेच गेल्यामुळे पक्षावर काेणाचे नियंत्रण नसल्याचा संदेश गेला आहे.

त्यातून या अपयशामागे नेमके कारण काय याचा शाेध सुरू झाला आहे. स्थानिकपातळीवर संघटनेत सक्षम चेहरा नसल्यामुळे अन्य पक्षातील कुंपणावरचे प्रमुख पदाधिकारी वा माजी नगरसेवक भाजपत येत नसल्याचे निष्कर्ष निघाल्याचे समजते. त्यातून शहराध्यक्ष गिरीष पालवे यांनी हटवण्याची माेहीम सुरू झाली असून नवीन चेहरा नियुक्तीची चाचपणी करण्यासाठी बावनकुळे व महाजन हे दाेघे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातून वेळ काढून नाशकात दाेन दिवस तळ ठाेकणार असल्याचे समजते.

साम-दाम -दंड अशा नितीच्या चेहऱ्याचा शाेध

राजकारणात आता राजकीय पक्षांच्या व्याख्येची परिभाषा बदलू लागली आहे. आक्रमक संघटना ही काळाची गरज बनली आहे. ही बाब लक्षात घेत, साम, दाम-दंड अशा सर्वच नीतींनी परिपुर्ण चेहऱ्याचा शाेध घेतला जात आहे. या चेहऱ्याच्यामाध्यमातून भविष्यात अन्य पक्षातील महत्वाच्या नेत्यांना आयात करणे, निष्ठावंतांना माेठी संधी देणे व आगामी लाेकसभेच्या पार्श्वभुमीवर भक्कम संघटनात्मक बांंधणी करण्याचा प्रयत्न आहे.

ही नवीन नावे चर्चत..

आमदार राहुल ढिकले, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, महिला शहराध्यक्ष हिमगाैरी आहेर-आडके, प्रशांत जाधव, विजय साने, सुनील केदार, अजिंक्य साने, महेश हिरे यांच्या नावाची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...