आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नाशकात भाजप - मित्रपक्ष असलेला बाळासाहेबांची शिवसेना अर्थातच शिंदे गटाने जाेरदार निर्दशने केले. दरम्यान, दाेन्ही पक्षांनी स्वतंत्र आंदाेलन करून केलेले शक्तीप्रदर्शनाचीही चर्चा रंगली.
शिंदे गटाकडून ‘जाेडे माराे’
गंजमाळ सिग्नल लगतच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यालयासमोर पालिकेचे माजी विराेधी पक्षनेता अजय बोरस्ते व महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्या नेतृत्वाखाली पवार यांच्या प्रतिमेला जाेडे माराे आंदाेलन झाले. यावेळी बाेरस्ते यांनी जाेरदार टिकास्त्र साेडले. अजितदादा हे राज्याचे विरोधी पक्षनेते असल्यामुळे असे वक्तव्य दुर्दवी आहे. शालेय पाठ्यपुस्तकातही संभाजी महाराजांचा इतिहास दिला असताना अशा प्रकारचे वादग्रस्त विधान करणे अवमानकारक आहे. तिदमे यांनी वक्तव्याचा निषेध करीत पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.
या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख शिवाजी भोर, माजी नगरसेवक श्यामकुमार साबळे, मामा ठाकरे, नितीन खर्जुल, नितीन साळवे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख लक्ष्मी ताठे, महिला महानगरप्रमुख अस्मिता देशमाने, सदानंद नवले, दिगंबर नाडे, विलास बोराडे, दत्ता ससाने, अक्षय कलंत्री, नितीन लासुरे आदी सहभागी झाले होते.
पुतळा दहन करत भाजपाचे आक्रमक आंदोलन
छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांच्या विराेधात घाेषणा देण्यात आल्या आहेत.
शहराध्यक्ष गिरीष पालवे, आमदार देवयानी फरांदे, ज्येष्ठ नेते विजय साने यांच्या नेतृत्वाखाली रविवार कारंजा येथे तर मुंबई नाका चाैकात महिला प्रदेशअध्यक्ष चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत आमदार सीमा हिरे, हिमगाैरी आडके, सुजाता करजगीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदाेलन करण्यात आले. पवार यांना विरोधी पक्षनेत्याच्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
या आंदाेलनात सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, काशिनाथ शिलेदार, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, सुनिल देसाई, भास्कर घोडेकर, देवदत्त जोशी, ॲड.अजिंक्य साने, स्वाती भामरे, तुषार भोसले आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.