आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजकाल माेबाईलवर लिहिलं जातं. साेशल माध्यमांतून ते पाेहाेचतंही पण ते लेखन डिलीट होते. पुस्तके कधीही डिलीट हाेत नाहीत. कागदावरचे काळजावर येण्याची गरज पुस्तकांचीच असते असा संवाद लेखक, कवी, गीतकार प्रवीण दवणे यांनी साधला.
कुसुमाग्रज स्मारकात रविवारी (दि. ७) अ. भा. प्रकाशक संघाच्या चाैथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात दवणे यांना सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार अाणि पाॅप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ यांना जीवनगाैरव पुरस्कार प्रदान करण्यात अाला.
यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर, नाशिक शाखेचे अध्यक्ष विलास पाेतदार, सुभाष सबनीस उपस्थित हाेते. दवणे पुढे म्हणाले की, अाज लेखकाने प्रकाशकाच्या हातात हात गुंफले पाहिजे. पुस्तकं विक्रीसाठी त्यानेही प्रयत्न केले पाहिजे. जे विकत घेतलं जात ते निगुतीनं वाचलंही जातं. अाज शाळेच्या पायऱ्या हरवलेल्या अाहेत. पाठीवर न्यायची पुस्तकं म्हणून ती पाठ्यपुस्तकं झाली अाहेत.
टकवा उडालेली पिढी निर्माण हाेते अाहे. त्यामुळे त्याचा विचार करुन एक वेगळी वाचन चळवळ उभी राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी व्यक्त केले. तसेच हा पुरस्कार मला भावनिक अनुबंधाचा पुरस्कार वाटताे. मात्र केवळ लिहून चालत नाही. तर ते प्रकाशितही करावं लागतं. त्यात वाचकांच्या प्रतिसादाची सरस्वती मिसळते. मी कधीही असं म्हणत नाही की, माझं पुस्तक खपत नाही. जाे प्रामाणिकपणे लिहिताे त्या लिखाणाला न्याय मिळताेच यावर माझा विश्वास असल्याचही त्यांनी नाेंदवलं.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी केले तर वसंत खैरनार यांनी परिचय करून दिला. संदीप देशपांडे यांनी मानपत्राचे वाचन केले. या कार्यक्रमानंतर जनस्थानातील साहित्य परंपरा या विषयावर चर्चासत्र पार पडले. यात सुरेश भटेवरा, वैशाली बालाजीवाले, मृदुला बेळे, प्रशांत पाटील व राहुल रनाळकर यांनी सहभाग घेतला.
त्यानंतर सुदेश हिंगलासपुरकर यांचा तसेच नाशिकमधील प्रकाशक, साहित्य पुरस्कार विजेते आणि दिवाळी अंक विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. मधुर बेळे व रवींद्र मालुंजकर यांनी सुत्रसंचालन केले तर सुभाष सबनीस यांनी आभार मानले.
आजही वयाच्या ८८ व्या वर्षी नाशिकला गायचे आहे: रामदास भटकळांची इच्छा
प्रकाशन संस्थेत कर्मचाऱ्यांपासून ते संपादकांपर्यंत सर्वांचा हा गाैरव आहे. लेखकांमुळेच प्रकाशन संस्थेचा गाडा सुरळीत सुरु आहे. उथळ पुस्तकांच्या कधीच मागे लागलो नाही. टिकतील आणि कायम मागणी राहील, अशाच पुस्तकांचे प्रकाशन केले. नाशिकमध्ये कुसुमाग्रजांच्या आग्रहाखातर मी शंभर लोकांच्या साक्षीने शास्त्रीय गायनाची मैफल सजविली होती. मी चांगले गातो, यावर कुसुमाग्रजांनी केलेल्या चेष्टेमुळे त्यांच्यासमोर मैफल सादर केल्यानंतरच मी चांगले गाऊ शकतो, याचा त्यांना विश्वास बसला. आजही वयाच्या ८८ व्या वर्षी पुन्हा नाशिकला येऊन गाणे सादर करण्याची इच्छा आहे, असे भटकळ यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
समाज माध्यमांच्या रेट्यातह पुस्तके घेऊन वाचण्याकडे चांगलाच कल
समाज माध्यमांच्या रेट्यापुढे छापील पुस्तके टिकाव धरणार नाहीत हा अपप्रचार असून आजही छापील पुस्तकांकडे वाचकांचा कल आहे. कागदांच्या वाढलेल्या दरांमुळे पुस्तक प्रकाशित करणे आणि वितरीत करणे यात अडथळे येत असले तरी प्रकाशक, लेखक आणि वाचक यांनी सुवर्णमध्य काढत एकत्रित जबाबदारी घेऊन वाचक चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी एकत्रीत प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी केले .
यावेळी राज्य शासनाचा उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपुरकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रकाशकांचा यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात येऊन या साहित्य संमेलनाचा समाराेप करण्यात अाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.