आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिर्यादी निघाला आरोपी:लग्नसाठी तगादा लावणाऱ्या मेहुणीचा दाजीने केला खून; इगतपुरी तालुक्यातील आधारवडची घटना

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जमिनीच्या वादातून जमावाने हल्ला केल्याचा केला होता बनाव

लग्नसाठी तगादा लावणाऱ्या मेहुणीचा दाजीने केला खून केल्याचे उघड झाले आहे. शनिवारी दिनांक 11 रोजी पहाटे इगतपुरी तालुक्यातील आधरवड गावाजवळील कातकरी वस्तीवर हा प्रकार उघडकीस आला. संशयित दाजीने जमिनीच्या वादातून बारशिंगवे गावातील जमावाने घरे जाळून घरावर हल्ला केला. या हल्ल्यात मेहुणी ठार झाल्याचा बनाव केला होता. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर संशयिताने खून केल्याची कबूली दिली. शरद महादू वाघ असे या संशयिताचे नाव आहे. लक्ष्मी संजय पवार वय 20 असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे.

दोन बायका सख्ख्या बहिणी

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आधरवड गावातील शरद वाघ हा कातकरी वस्तीवर दोन बायकांसोबत वास्तव्यास आहे. दोन्ही बायका या सख्ख्या बहिणी आहेत. संशयिताचे लहान मेहुणी लक्ष्मीसोबत प्रेमसंबध होते. काही दिवसांपासून मेहुणीने संशयित शरद वाघ यास तिसरे लग्न करण्यास तगादा लावला होता. मात्र, संशयित शरद हा लग्न करण्यास नकार देत होता. दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. चार दिवसांपासून ती कातकरी वस्तीवर दाजी शरद वाघ याच्या घरी बहिणीकडे आली होती. शुक्रवारी दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. तेव्हा तीने मी आत्ता काय करते ते तू बघ असा दम दिला होता. मध्यरात्री लक्ष्मीने पुन्हा शरदला लग्नाबाबत शेवटचे लग्न करणार की नाही, असे विचारले. तेव्हा शरदने नकार दिल्यानंतर लक्ष्मीने घराच्या शेजारी असलेल्या तीन ते चार झोपड्यांना आग लावली. या रागातून संशयित शरद वाघ याने मेहुणीला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांची केली दिशाभूल

संशयित शरद वाघ याने मेहुणीचा खून केल्यानंतर जमिनीच्या वादातून बारशिंगवे गावातील जमिनीच्या वादातून येथील 50 ते 60 लोकांच्या टोळक्याने घरावर हल्ला केला. या हल्ल्यात मेहुणीचा मृत्यू झाला, अशी तक्रार पोलिसांत देणार होता. मात्र, पोलिसांना संशय आला. त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केल्यानंतर त्याचा जबाबाच्या अधारे वेळ आणि घटनेत तफावत आढळली. संशयिताला खाक्या दाखवल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली.

बातम्या आणखी आहेत...