आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायर फुटल्याने दुभाजक ताेडून बसची दुचाकीला धडक:नाशिकमध्ये महाविद्यालयीन युवक जागीच ठार, युवती गंभीर

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नर्मदा परिक्रमा करण्यासाठी निघालेल्या ट्रॅव्हल्स बसचे टायर फुटल्याने बस दुभाजक तोडून दुसऱ्या लेनमध्ये गेली. यात बसने एका दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला आहे.

तर, दुचाकीच्या पाठीमागे बसलेली युवती गंभीर जखमी झाली आहे. शनिवारी सकाळी नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेळगाव ढगा परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर जिल्हा शासकीय रूग्णालयात महाविद्यालयीन युवकांनी गर्दी केली होती.

पुणे येथून नर्मदा परिक्रमा करण्यासाठी निघालेली श्रीराम ट्रॅव्हल्स कंपनीची बस शुक्रवारी रात्री त्र्यंबकेश्वरला पोहचली होती. बसमध्ये चालकासह एकुण ३२ प्रवाशी होते. रात्री त्र्यंबकेश्वर येथे मुक्काम केल्यानंतर शनिवारी (दि.११) सकाळी बस पुढील मार्गक्रमणासाठी त्र्यंबकेश्वरहून नाशिकच्या दिशेने निघाली होती. बेलगाव ढगा फाट्याजवळील एस्पालिअर स्कुलजवळ बस आली असता तिचे टायर फुटले. त्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये आली.

याचवेळी नाशिकहून त्र्यंबककडे जाणाऱ्या दोन दुचाकींना धडक देत बस झाडावर आदळली. यात एका दुचाकीवरील दोघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात शहरातील केटीएचएम महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षात शिकणारा ओम देवेंद्र तासकर (वय २१) हा विद्यार्थी जागीच ठार झाला. तर आकांक्षा जाधव (वय २१) ही युवती गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे वृत्त समजताच सातपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक राजु पठाण यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजुला करत वाहतुक सुरळीत केली.

दोन दिवसांपूर्वीच वणी सापुतारा मार्गावर अशाच प्रकारे झालेल्या भीषण अपघात एकाच कुटुंबातील तिघांना प्राण गमवावे लागले होते. यात एका आठ महिन्याच्या चिमुरडीचा देखील समावेश होता.

अपघातात ओम तासकर याचा मृत्यू झाला.
अपघातात ओम तासकर याचा मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...